शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याने सरपंच पद रद्द

निफाड तालुक्यातील बोकडदरे येथील सरपंच आशा भाऊराव दराडे व ग्रामपंचायत सदस्य स्वाती शंकर बोराडे यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचे उघड झाल्याने या दोघींचे पद उर्वरित कालावधीसाठी अपात्र घोषित करण्यात आले. अपर आयुक्त भानुदास पालवे यांनी ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, पालवे यांनी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी दिलेला निकाल चुकीचा असल्याचे सांगत अपीलकर्ते चंद्रकांत सांगळे यांच्या बाजूने निकाल दिला आहे.

नाशिकमध्ये ईडीचे छापासत्र? नवाब मलिक यांच्या निकटवर्तीयांची चौकशी?
सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सांगळे यांनी बोकडदरे येथील सरपंच दराडे यांनी वनविभागाच्या गट नं. १६८ मध्ये शेततळे बांधून अतिक्रमण केल्याची बाब अपर आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. सदस्य बोडके यांनी शासनाच्या गट नं. १६६ मधील ग्रामपंचायतीच्या गुरे चरण जागेवर अतिक्रमण करून मिळकत क्रमांक ९५ मध्ये रहिवास करीत असल्याची तक्रारही त्यांनी आयुक्तांकडे केली. त्यावरून पालवे यांनी दोघींचे पद रद्द केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *