टेलीग्रामवरून करता येणार बक्कळ कमाई; जाहिरातींमधून मिळणार रेव्हेन्यू
टेलीग्रामचे (Telegram) सीईओ आणि संस्थापक पावेल दुरोव यांनी कंपनीच्या आगामी जाहिरात महसूल क्षेत्रातील प्लॅटफॉर्मसाठी योजनांचे अनावरण केले आहे, जे पुढील महिन्यात लॉन्च होणार आहे. हे प्लॅटफॉर्म टेलिग्रामवरील चॅनल मालकांना त्यांच्या कन्टेन्टवर कमाई करण्याची संधी देणार आहे. या रिवॉर्ड्सच्या सिस्टिममध्ये TON ब्लॉकचेनवरील टनकॉइनचा (क्रिप्टो करन्सी) वापर समाविष्ट असेल, ज्यामध्ये चॅनल मालकांना त्यांच्या चॅनेलमध्ये प्रदर्शित केलेल्या जाहिरातींमधून उत्पन्नाच्या 50% उत्पन्न मिळेल .
वाढणार कमाईच्या संधी
टेलिग्राम चॅनेल बहुसंख्य प्रेक्षकांसाठी सार्वजनिक संदेश प्रसारित करणारे एक व्यासपीठ म्हणून काम करते . यावेळी कंपनीचे सीईओ दुरोव यांनी सांगितले की, टेलिग्रामवरील प्रसारण चॅनेलद्वारे दर महिन्याला तब्बल एक ट्रिलियन व्ह्यूज मिळूनही, सध्या टेलीग्राम जाहिरात प्रमोशन टूलद्वारे केवळ एक अंश, म्हणजेच अंदाजे 10% एवढीच कमाई करत आहे. मार्च महिन्यात टेलिग्राम अँड प्लॅटफॉर्मचे रोलआउट सुमारे शंभर देशांमधील चॅनेल मालकांना कमाईच्या संधी वाढवेल अशी माहिती त्यांनी दिली. हे उत्पन्न टेलिग्राम इकोसिस्टममध्ये कन्टेन्ट मिळकतीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल राहिल असेही अधोरेखित करण्यात आले आहे.
क्रिप्टो करन्सीचा वापर
रेव्हेन्यू शेअरिंगच्या निकषांशी संबंधित कुठलाही तपशील माहित नसतांना, कंपनीने युजर्सना आगामी डीटेल्सची खात्री दिली आहे. या व्यवहारांसाठी केवळ TON ब्लॉकचेनचा लाभ घेऊन जलद आणि सुरक्षित जाहिरात देयके आणि पैसे काढणे सुनिश्चित करण्यासाठी कंपनी वचनबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. फ्रॅगमेंटवर टेलीग्राम युजर्ससाठी जाहिरात विक्री आणि चॅनेल मालकांसह महसूल वाटणीची (रेव्हेन्यू शेअरिंग ) सुविधा टोनकॉइनद्वारे केली जाईल.या प्रक्रियेत कन्टेन्ट निर्माते त्यांच्या टॉन्कोइन्सचे पारंपारिक चलनात रूपांतर करू शकतात किंवा चॅनेल प्रमोशन आणि वाढ करण्याच्या प्रयत्नांमध्ये त्यांची पुनर्गुंतवणूक करू शकतात.
सकारात्मक प्रतिसाद
जाहिरात प्लॅटफॉर्मच्या या घोषणेमुळे TON टोकनच्या मूल्यात वाढ झाली, ज्यामध्ये तात्काळ सुमारे 40% ची 2.92 डॉलर पेक्षा जास्त वाढ झाली आहे. ही वाढ टेलीग्रामच्या नवीन प्रयत्नांना बाजारातील सकारात्मक प्रतिसाद दर्शवते.
टेलिग्राम करणार सोशल प्लॅटफॉर्म्सची बरोबरी
जाहिरात महसूल क्षेत्रात टेलीग्रामच्या (Telegram) प्रवेशाने त्याला आता इतर मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या रांगेत नेऊन बसवले आहे. YouTube , X (पूर्वी Twitter) हे प्लॅटफॉर्म देखील जाहिरातींतून महसूल निर्मिती करतात. YouTube निर्मात्यांना जाहिरात महसूलाच्या 55% प्राप्त होतात, तर X ची महसूल वाटणी योजना जुलै 2023 मध्ये सुरू झाली. Meta, (Facebook ची मूळ कंपनी ) जाहिरातींवर रील निर्मितीच्या कमाईसाठी नवीन पेमेंट पद्धतीचा प्रयोग करत आहे.
जागतिक स्तरावर 800 दशलक्ष मंथली मेंबर युजर्सपेक्षा जास्त युजर्स असलेल्या टेलीग्रामचे जाहिरात महसूल क्षेत्रामध्ये पाऊल हे त्या प्लॅटफॉर्मच्या प्रगतीचा एक महत्वाचा टप्पा म्हटला पाहिजे.