मोदींकडून DRDO च कौतुक, किती घातक आहे दिव्यास्त्र?
भारताने सोमवारी स्वदेशी बनावटीच्या Agni-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी (test trial) केली. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया पोस्टवर याची माहिती देऊन DRDO च्या वैज्ञानिकांच अभिनंदन केलं. अग्नि-5 एक न्यूक्लियर बॅलेस्टिक मिसाइल असून यामध्ये MIRV टेक्नोलॉजी आहे. भारताच्या शत्रूंसाठी हा एक इशाराच आहे. या मिसाइलच्या यशस्वी परीक्षण चाचणीमुळे भारताच्या टप्प्यात फक्त चीन-पाकिस्तान नाही, तर निम्म जग आलं आहे.
भारताकडे अग्नि सीरीजची 1 ते 5 क्षेपणास्त्र असून प्रत्येकाची वेगवेगळी रेंज आहे. अग्नि-5 सर्वाधिक घातक आहे. 5 हजार किलोमीटरपेक्षा पण अधिक लांबच लक्ष्य भेदण्यासाठी अग्नि-5 सक्षम आहे. या क्षेपणास्त्राच्या चाचणीसाठी भारताची मागच्या काही दिवसांपासून तयारी सुरु होती. ही चाचणी (test trial) कधी होणार? त्या बद्दल कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. 16 मार्च पर्यंत DRDO कडून कधीही या क्षेपणास्त्राची चाचणी होईल, असं बोलल जात होतं. त्यासाठी ओदिशाच्या किनाऱ्याजवळ एपीजे अब्दुल कलाम बेटापासून 3500 किमी पर्यंतच क्षेत्र नो फ्लाई जोन घोषित करण्यात आलं होतं.
चीनच्या बीजिंगपर्यंत हे क्षेपणास्त्र किती वेळात पोहोचेल?
रेंज आणि वेग हे अग्नि-5 क्षेपणास्त्रच वैशिष्ट्य आहे. या क्षेपणास्त्रामुळे अगदी काही मिनिटात चीन-पाकिस्तानच मोठ नुकसान होऊ शकतं. दिल्लीत ते बीजिंग पर्यंतच अंतर 3791 किमी आहे. हे अंतर कापण्यासाठी अग्नि-5 क्षेपणास्त्राला फक्त 12.63 मिनट लागतील. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये अग्नि-5 फक्त दीड मिनिटात पोहोचेल. म्हणजे नवी दिल्ली ते इस्लामाबाद हे 679 किमीच अंतर अग्नि-5 क्षेपणास्त्र अवघ्या दीड मिनिटात कापेल. याची रेंज लक्षात घेता पाकिस्तानच्या पुढे अफगाणिस्तान आणि इराणपर्यंत लक्ष्यभेद करता येऊ शकतो.
अग्नि-5 चं वैशिष्ट्य काय?
अग्नि-5 एक इंटरमीडिएट रेंजची बॅलेस्टिक मिसाइल आहे. अणवस्त्र वाहून नेण्यास अग्नि-5 सक्षम आहे. थर्मोबेरिक बॉम्ब म्हणजे सोप्या भाषेत वॅक्यूम बॉम्ब म्हणतात. शत्रूची श्वास रोखण्याची क्षमता या बॉम्बमध्ये आहे. हा बॉम्ब सुद्धा या क्षेपणास्त्रातून डागता येऊ शकतो. एकाचवेळी 2490 किलोग्राम पेलोड वाहून नेण्यास सक्षम आहे. पेलोड म्हणजे वजन वाहून नेण्याची क्षमता.
काय आहे ही MIRV टेक्निक?
अग्नि-5 मध्ये MIRV मल्टीपल इंडिपेंडेंटली टारगेटेबल री-एंट्री व्हीकल टेक्निक आहे. या टेक्नोलॉजीमुळे एकाचवेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करता येऊ शकतो. प्रतिसेकंद 6 किमी या क्षेपणास्त्राचा वेग आहे. लक्ष्यापासून 40 मीटर अंतरावर पडल्यानंतरही हे क्षेपणास्त्र शत्रुला पूर्णपणे उद्धवस्त करु शकतं. अग्नि-5 मध्ये रिंग लेजर गाइरोस्कोप इनर्शियल नेविगेशन सिस्टम आहे, त्यामुळे हवेत उड्डाणावस्थेत असताना हे क्षेपणास्त्र अचानक आपला मार्ग सुद्धा बदलू शकतं.