तुळ राशी भविष्य
तुमची शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला आपल्या संतानमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. कुटुंबाचे सगळे थकलेले कर्ज तुम्ही फेडू शकाल. प्रिय व्यक्तीला फुले आणि सुंदर भेटवस्तू देऊन संध्याकाळ प्रणयराधनेत घालवाल. तुम्ही केलेल्या एका चांगल्या कृतीमुळे, कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे शत्रू आज मित्र होतील. आपले मत विचारल्यानंतर मांडताना उगाच भीड बाळगू नका, आपल्या मताचे खूप कौतुक होऊ शकते. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल, तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल.