वृश्चिक राशी भविष्य
स्वत:मध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत तर त्याचा दुहेरी फायदा होईल – तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवतो. स्वत:चे लाड पुरविण्यात, स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा आयुष्याचे धडे गिरवा. आपल्यावर प्रेम करणा-या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका. तुमच्या भागीदाराशी काहीही व्यवहार करणे, त्याच्याशी बोलणे कठीण होऊन बसेल. या राशीतील व्यक्ती रिकाम्या वेळेत आज कुठल्या ही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमचा /तुमची जोडीदार आज तुमच्या टीनएजमधील काही आठवणींना उजाळा देईल, त्यापैकी काही आठवणी खट्याळसुद्धा असू शकतील.