त्यांचा भोंगा वाजला नाही, जनता त्यांना भोंगा दाखवेल

सर्व दैवतं आमच्या पाठीशी आहेत. रामाचा धनुष्य आमच्याकडेच आहे. महाराष्ट्राची जनता जाती पाती मानत नाही. त्यांचा भोंगा वाजला नाही, जनता भोंगा दाखवेल. असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. विरोधी पक्षांवर निशाणा साधत त्यांनी ही टिका केली.

दरम्यान, त्यांनी कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीचा दाखला देत ‘एक सिनेमा होता केला इशारा जाता जाता’ असं म्हणत महाराष्ट्रात महाविकास आघाडी ही आघाडीवरच राहील” असं मत व्यक्त केलं.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदीवरच्या भोंग्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार टीका होताना दिसत आहेत. या भोंगा प्रकरणावरून शिवसेना संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत ईडीच्या कारवाईमुळे राज ठाकरे यांचा भोंगा सुरु झाला आहे. भाजपने त्यांना अभय दिले आहे, त्यानंतर त्यांचा भोंगा सुरु झाला आहे अशी टीका त्यांनी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *