जेवणात घालता मसाल्यांचा जोरदार तडका? मग आधी जाणून घ्या गरमीत कोणते मसाले खावेत व कोणते नाही..!

स्वयंपाकघरात ठेवलेले मसाले तुमच्या जेवणाची चव आणि पोत वाढवतात. हे तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की उन्हाळ्यात काही मसाले खाणे कटाक्षाने टाळले पाहिजेत. याचे कारण असे की मसाले गुणधर्माने गरम असतात आणि शरीरात उष्णता निर्माण करतात. तर काही मसाले उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्याचे काम करतात. उन्हाळ्यातही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मसाल्यांचे सेवन करणे चांगले मानले जाते. कारण, भारतातील बहुतांश भागात उन्हाळा खूप जास्त असतो.

या ऋतूत लोकांना भूक न लागणे, अपचन, डिहायड्रेशन, सनबर्न, जळजळ, थकवा, घाम येणे, उष्माघात आणि पुरळ उठणे किंवा रॅशेज असे त्रास होतात. उष्णतेमुळे तुमची उर्जा पातळी कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत आपल्या आहारात काही प्रकारचे मसाले समाविष्ट करणे आणि काही टाळणे ही उष्णतेशी लढा देण्यासाठी खूप मदत होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया उन्हाळ्यात कोणते मसाले खावेत आणि कोणते मसाले खाणे टाळावेत.

कोथिंबीर
कोथिंबीरीच्या पानांमध्ये शरीराला थंडावा देण्याचे गुणधर्म असतात. उन्हाळ्यात याचे सेवन केल्यास शरीरात सूज येण्याची शक्यता कमी होते.

पुदिना
पुदिना अनेकदा माउथ फ्रेशनर म्हणून वापरला जातो, परंतु उन्हाळ्यात तो शरीराला थंडावा देतो, अपचन कमी करतो, छातीतील वेदना कमी करतो आणि सोबतच हार्टबर्नपासून आराम देतो.

आले
आले हे केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर चहाला उत्तम चव आणण्यासाठी सुद्धा एक स्वस्त पर्याय आहे. आले हे उष्ण आहे, त्यामुळे हिवाळ्यात त्याचे सेवन करणे चांगले मानले जाते. पण याउलट उन्हाळ्यात शरीराचे तापमान वाढण्यास ते जबाबदार असते. कधी कधी त्यामुळे घामही येऊ शकतो. ज्या लोकांना मधुमेह आणि ब्लीडिंग डिसऑर्डरची समस्या आहे त्यांनी उन्हाळ्यात आले खाणे टाळावे. जास्त प्रमाणात आल्याचे सेवन केल्यास पोटाच्या समस्यांसह छातीत जळजळ (heartbern), जुलाब, वारंवार ढेकर येणे या समस्या होऊ शकतात.

लाल मिरची
अन्नपदार्थ मसालेदार बनवण्यासाठी आणि त्यात रंग घालण्यासाठी आपण सहसा लाल तिखट किंवा मिरचीचा वापर करतो. पण प्रत्यक्षात असे केल्याने तुमच्या शरीराला हानी पोहोचू शकते. या गरम मसाल्याच्या अतिसेवनाने शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे घामासोबत पोट आणि छातीत जळजळ अशा समस्या होऊ शकतात. म्हणजेच लाल मिरची उन्हाळ्यात खाऊ नये.

काळीमिरी
चयापचय दर वाढवण्यासाठी काळीमिरी हा एक अतिशय आरोग्यदायी पर्याय आहे. पण उन्हाळ्यात ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढू शकते. याशिवाय काळीमिरी काही औषधांचा प्रभावही कमी करू शकते. कोणत्याही औषधासोबत काळीमिरी सतत खाल्ल्यास ऍलर्जी होऊ शकते.

लसूण
वजन कमी करण्यासाठी, भूक कमी करण्यासाठी आणि चयापचय वाढवण्यासाठी लसूण दीर्घकाळ वापरला जात आहे. पण उन्हाळ्यात याचे कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे. हिवाळ्यात लसणाचे अनेक फायदे आहेत, परंतु उन्हाळ्यात त्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जात नाही, कारण यामुळे शरीरातील उष्णता वाढते. याशिवाय, यामुळे श्वासातून दुर्गंधी, ऍसिड रिफ्लक्स आणि ब्लीडिंगचा धोका देखील वाढू शकतो.

जिरे
पोटाच्या समस्यांवर, पोट फुगण्यावर, पोटातील सूजेवर जिरे हा एक उत्तम उपाय आहे. हे गरम हवामानात डिटॉक्सिफायिंग आणि कूलिंग एजंट म्हणून कार्य करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *