कोल्हापुरात याबाबतचा काढण्यात आला तातडीने आदेश

राजर्षी शाहू छत्रपतींच्या येत्या 6 मे रोजी होणार्‍या स्मृती शताब्दीनिमित्त ‘लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्व’ आयोजित करण्यात आले आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत 5 कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (minister) यांनी बुधवारी सांगितले. याबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी पाठपुरावा केला.

कोल्हापुरात झालेल्या राष्ट्रवादीच्या संकल्प सभेत धनंजय मुंडे (minister) यांनी याबाबतची घोषणा केली होती. त्यानुसार याबाबतचा आदेश तातडीने काढण्यात आला आहे. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी समाजकारणाचा पाया मजबूत करून सामाजिक न्यायाची वाटचाल सुकर केली. 6 मे 1922 रोजी शाहू छत्रपतींचे महानिर्वाण झाले.

येत्या 6 मे 2022 पासून राजर्षींचे स्मृती शताब्दी वर्ष सुरू होत आहे. राजर्षी शाहू छत्रपतींनी सामाजिक जडणघडणीत दिलेल्या योगदानाच्या कृतज्ञतेच्या भावनेतून हे कृतज्ञता पर्व होत असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *