देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना दिलं नवीन नाव, म्हणाले…

भाजप नेते देवेंद्र फडणवीस (BJP leader Devendra Fadnavis) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना पुन्हा एकदा डिवचलं आहे. यावेळी फडणवीसांनी आदित्य ठाकरे यांना नवीन नाव दिलं आहे. त्यामुळे आता फडणवीसांच्या टीकेला आदित्य ठाकरे काय नाव देतात हे पाहावं लागेल. देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना मर्सिडीज बेबी असं नवीन नाव दिलं आहे.1857 च्या युद्धात ही फडणवीस असतील या आदित्य ठाकरेंच्या टिकेला उत्तर देत फडणवीस म्हणाले की, सोन्याच्या चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्याला संघर्ष माहिती नाही. त्यामुळे करसेवकांची थट्टा ते नक्की उडवू शकतात. मी हिंदू आहे त्यामुळे मागच्या जन्मावर विश्वास आहे. त्यामुळे 1857 मध्ये मी नक्की तात्या टोपे आणि राणी झाशी यांच्याबरोबर युद्धात असेन आणि हे त्याही वेळी इंग्रजा बरोबरच युती असणार. तुम्ही आता ही अशा लोकांशी युती केली आहे जे 1857 ला स्वातंत्र्य युद्धच मानत नाही. ते त्याला सैनिकांचे बंड म्हणतात.पुढे फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझ्या बायकोत एक साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारणे सोडत नाही आणि माझी पत्नी ही अशा फालतू टोमण्यांना उतर देणं सोडत नाही.राज्य सरकारने राजद्रोह लावण्याचा करंटेपणा केला, त्यांना जामीन मिळणारच होता, अशा शब्दात फडणवीसांनी राणा दाम्पत्याला मिळालेल्या जामीनावर प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *