‘यायलाच पाहिजे..!’, मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी शिवसेनेचा जबरदस्त टीझर

शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena chief) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची येत्या 14 मे रोजी बीकेसीमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेचा टीझर (Teaser) शिवसेनेकडून (Shiv Sena) ट्विट (Tweet) करण्यात आला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांच्या भाषणाचा अंश वापरून सभेसाठीचा टीझर तयार करण्यात आला आहे. शिवसेनेनं (Shiv Sena) हा टीझर सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे.

हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील अंश टीझरमध्ये वापरण्यात आला आहे. “मी शिवसेना प्रमुख जरुर आहे. पण तुमची ताकद माझ्यासोबत आहे, म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे.”, असं टीझरमध्ये बघायला मिळतंय. तसंच साहेबांवर श्रद्धा असणाऱ्या, प्रत्येक शिवसैनिकाने खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला, यायलाच पाहिजे, असं आवाहनंही शिवसेनेनं टीझरमधून केलं आहे.काल पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी मास्क न लावता भाषण केले आणि 14 तारखेच्या सभेत मनात बरचं साचलंय ते बोलणार आहे, असा विरोधकांना इशाराही दिला. मुंबईमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टयांमध्ये आणि निवासी इमारतींमधील रहिवाशांनाही नळजोडणी मिळावी, यासाठी महानगरपालिकेच्या ‘सर्वांसाठी पाणी !’ या धोरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी उद्धव ठाकरेंनी मास्क काढून जोरदार भाषण केलं.

‘आता आपण माणसात आलोय असं वाटतंय कारण बऱ्याच दिवसांनी माईकसमोर बोलायला लागलो आहे. बऱ्याच दिवसांनी मास्क न घालता बोलत आहे, तसा मास्क काढायचा आहे तो 14 तारखेला काढायचा आहे. आताचा कार्यक्रम हा महापालिकेचा आहे. सर्वांसाठी पाणी देण्याचा कार्यक्रम आहे. त्याच्या राजकारण आणून पाणी गढूळ करणार नाही. प्रत्येकाला याचे भान असले पाहिजे, कुठे काय बोलायचे याचे ज्ञान असले पाहिजे’ असा टोला उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला.’हल्ली विचारांचे प्रदुषण होतंय कोणीही काहीही बोलत आहेत. विकृत विचार मांडले जात आहे. राजकारण जरूर करा पण त्यात एक दर्जा असला पाहिजे. नुसता विरोध करणे म्हणजे विरोधी नाही, सरकारने चागले काम केले तर सांगणे ही दिलदारी आहे पण आता ती दिसत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावला.

’14 तारखेला माझी सभा आहे, मला माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझ्या मनात काही तुबलेलं नाहीय पण मनात अनेक काही गोष्टी आहेत त्या बोलणार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. हल्ली थापा मारण्याची फार सवय आहे. अच्छे दिन येतील असं म्हटले होते, पण आता वाट बघतोय, अशा थापा चालणार नाहीत. कौतुकाची थाप मारणारे कमी आहेत बाकी थापा मारणारे जास्त आहेत, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला.

रवी राणा संतापले; संजय राऊतांवर जोरदार टीका, म्हणाले, ”चवन्नीछाप माणूस”

मी पक्का मुंबईकर आहेच, मुंबईत जन्मलेला राज्याचा पहिला मुख्यमंत्री आहे. याचा मला जास्त अभिमान आहे. १ मे ला ६२ वर्ष झाली, महाराष्ट्राच्या संयुक्त लढाईत आमचे आजोबा होते. लहानपणापासून आम्ही मुंबई आम्ही कशी बदलत आली हे पाहत आलोय, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. चलो ॲपचं एकच तिकीट सगळीकडे चालणार आहे निवडणुक सोडून चालणार आहे. आधीच स्पष्ट केले तर ते बरे ठरेल. मुंबई ईलेक्ट्रीक बस चालवली जाणार आहे. मुंबई महापालिका एकमेव आहे जी शाळेत सीबीएसई पॅटर्न आहे, दिल्लीत असेल पण ही असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *