मिथुन राशी भविष्य

आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. जे लोक आतापर्यंत पैश्याचा विचार न करता खर्च करत होते त्यांना आज पैश्याची अधिक आवश्यकता पडू शकते आणि आज तुम्हाला समजेल की, पैश्याची आपल्या जीवनात काय किंमत असते. कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. राग हा केवळ काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो आणि त्यामुळे तुमच्या हातून काही मोठ्या चुका घडू शकतात, याची जाणीव ठेवा.

तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे कारण तुमचे प्रियकर/प्रेयसी अंदाज लावता येणार नाही अशा मूडमध्ये आहेत. तुमच्या अवतीभवती काय घडतेय याकडे लक्ष द्या – आज तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसरेच कुणीतरी घेण्याची शक्यता आहे. आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागा – परंतु फक्त कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा. आज तुम्हाला तुमच्या जाडीदाराची ‘फार चांगली नसलेली’ बाजू पाहायला मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *