कीटकनाशक सेवन करीत शेतकर्‍याची आत्महत्या

तालुक्यातील नाळे येथे शेतकर्‍याने विषारी कीटकनाशक सेवन करीत आत्महत्या केली. मंगळवारी (दि. 10) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

निवृत्ती चैत्रराम जाधव (40) असे मयताचे नाव आहे. त्यांनी राहत्या घरात कीटकनाशक सेवन केले. त्यांना भाचा अंबरनाथ बागूल याने मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *