विद्यार्थ्यांना लॉटरी! कोणतेही प्रश्न सोडवा आणि गुण मिळवा

परीक्षा म्हटलं की पोटात गोळा येतो. पण परीक्षा कोणाला चुकली नाही. परीक्षा देण्याशिवाय पर्याय नसतो. त्यात कोरोनामुळे ऑनलाईन परीक्षा झाल्याने ऑफलाईन परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांना (students) धडकी भरते.

ऑफलाईन परीक्षा घेत असल्याने आता विद्यार्थ्यांना टेन्शन आलं आहे. मात्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या मनावरचं ओझं कमी झालं आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा 1 जून पासून घेण्यात येणार आहेत.

सर्व परिक्षा ऑफलाइन होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या विद्यार्थ्यांना कोणतेही प्रश्न सोडविणयाची मुभा देण्यात आली आहे. विद्यापीठात ऑफलाइन परीक्षा घेण्यीची सर्व तयारी विद्यापीठाद्वारे करण्यात आली.

विद्यार्थ्यांना नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटांचा अधिक वेळ प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी देण्यात आला आहे. प्रश्नपत्रिका या बहुपर्यायी (एमसीक्यू) राहतील असे विद्यापीठाने जाहिर केले आहे.

विद्यार्थ्यांना (students) मिळणार या सवलती :

प्रश्न पत्रिकेत विचारलेले पर्यायी प्रश्न प्रश्नही सोडवू शकतात. दोन्ही प्रश्नांचं मूल्यमापन होणार आहे.
एकूण जर 160 गुणांची प्रश्नपत्रिका असेल तर 80 गुणांचे प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवणं बंधनकारक असेल

विद्यार्थ्यांना 15 मिनिटं जास्त वेळ मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *