वसंत मोरे शिवसेनेच्या वाटेवर?

पुण्यात आज मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात भेट झाली. शहरप्रमुख गजानन थरकुडे यांनी वसंत मोरे यांची ओळख करून दिली. त्यावर संजय राऊत म्हणाले ‘तात्या का?’

संजय राऊत यांनी वसंत मोरे यांच्या खांद्यावर हात टाकला. आणि जाता जाता म्हणाले ‘भेटू भेटू…’

मनसेचे नेते वंसत मोरे हे पक्षात नाराज असल्याची काही दिवसांपासून चर्चा आहे. त्यात संजय राऊत आणि वसंत मोरे यांच्या भेटीनंतर वसंत मोरे हे शिवसेनेत जाणार का अशा चर्चेला उधाण आलं आहे.
राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा उचलल्यानंतर वसंत मोरे यांनी मात्र त्याला विरोध केला होता. राज ठाकरे यांनी पुण्यात महाआरती केली तेव्हा देखील वसंत मोरे उपस्थित नव्हते. 3 जून रोजी मनसेच्या नेत्यांना जेव्हा नोटीस बजावण्यात आल्या आणि काही नेत्यांना ताब्यात घेतलं गेलं तेव्हा देखील वसंत मोरे हे बालाजीला निघून गेले होते.

संजय राऊत यांच्या सोबत झालेल्या भेटीनंतर वसंत मोरे यांनी यावर स्पष्टीकरण देणं टाळलं. संजय राऊत यांनी यावेळी वसंत मोरे यांच्या कामाचं कौतुक ही केलं. एका लग्नात या दोघांची भेट झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *