जयसिंगपूर – भाजप प्रवक्ता नुपुर शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन यांचे निवेदन
प्रतिनिधी:- विजय पाटील
(local news) ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन जयसिंगपूर शहर यांच्याकडून इस्लाम धर्माचे प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्या विरूद्ध अपशब्द वापरलेल्या भाजप प्रवक्ता नुपुर शर्मा यांच्या वर गुन्हा दाखल करणे बाबत जयसिंगपूर पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के साहेब यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन शहर येथील कोल्हापुर जिल्हाध्यक्ष इम्रान सनदी , जयसिंगपुर शहराध्यक्ष हैदर शेख, शिरोळ तालुका अध्यक्ष जमीर नदाफ , कार्यअध्यक्ष शाहरुख पिरजादे ,महासचिव सुल्तान शेख,सरचिटणीस सादीक हिप्परगी, निरीक्षक अन्वर शेख, उपनिरीक्षक आशरफ मुजावर ,इम्रान शेख ,माजीद शेख तसेच नांदणी खीदमत फौंडेशन चे मौला भाई सादुले ,असगर भाई व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (local news)