हिवाळ्यात टमाटर सूप पिण्याचा कंटाळा आला मग हे सूप करा ट्राय
हिवाळ्यात घरी गरमा गरम टमाटर सूप (soups) प्यायला आपल्याला खूप आवडतं. कारण प्रत्येक घरात टमाटर असतात. त्यात हे सूप बनविण्यासाठी सोपं आणि चवीला खूप चांगलं असून ते हेल्दी पण आहे. हिवाळ्यात गरमा गरम सूप प्यायला खूप चांगलं असतं. तसंच टमाटर सूप प्यायलाने शरीरालाही गरम ठेवण्यात फायदा होतो. पण टमाटर सूप पिऊन तुम्ही कंटाळे असाल तर म्हणून आज आम्ही तुम्हाला हेल्दी आणि सोपे सूपची रेसिपी सांगणार आहोत.
पत्ता कोबी सूप
बारीक चिरलेला कांदा तेलात चांगला परतून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेली पत्ता कोबी परतून घ्या. मग त्यात तुमच्या आवडीच्या भाज्या वाटाणे, हिरवे कांदे आवडतं असेल तर बारीक चिरलेला टमाटर मिक्स करा. आणि एक वाफ काढा. त्यानंतर त्यात दोन ग्लास पाणी घालून हे मिक्स चांगलं शिजू द्या. आता हे सूप जरा घट्ट करण्यासाठी यात थोडं कॉर्नफ्लोअर टाका. तुमचं सूप गरमा गरम पिण्यासाठी तयार.
गाजर सूप
हे सूप (soups)बनविण्यासाठी सोपं आणि स्वादिष्ट आहे. कढईत थोड्याशा तेलात बारीक चिरलेला हिरवा कांदा, लसूण आले आणि गाजराचे तुकडे परतून घ्या. त्यात मटार पण टाका. झाकण ठेवून एक वाफ काढा. मग त्यात दोन ग्लास पाणी टाका आणि 10 मिनिटं उकळी येऊ द्या. यात चवीनुसार जिरे पावडर, मिरपूड घ्याला. सूप घट्ट येण्यासाठी त्यात कॉर्नफ्लोअर टाका.
मशरुम सूप
एका कढईत तेल टाकून चिरलले हिरवे कांदे, सेलेरी, फ्लॉवर, कांदा, लसूण परतून घ्या. मग त्यात एक चिरलेला मशरुम घालून परतून घ्या. मग त्यात 2 कप व्हेजिटेबल स्टॉक, 1 टेबलस्पून बाल्सॅमिक व्हिनेगर आणि 1 टेबलस्पून सेलेरी टाकून साधारण 20 मिनिटे उकळा. आता यात थोडे मीठ आणि मिरपूड घालून गरमा गरम सूप पिण्यासाठी तयार झालं आहे.
कॉर्न सूप
एका कढाईत तेल आणि बटर घालून त्यात चिरलेले कांदे, सेलरी, गाजर, लसूण आणि बारीक चिरलेलं गाजर टाकून परतून घ्या. त्यात 1 कप कॉर्न आणि 2 कप व्हेजिटेबल स्टॉक घालून उकळवा. मग त्यात 1 कप कॉर्न पेस्ट टाका आणि परत एक उकळी काढा. आता यात जरा जिरे पावडर, मिरपूड आणि मीठ घाला आणि गरमागरम सूप पिण्यासाठी तयार झालं.