लहान मुलं का किंचाळतात?

मला ना लहान मुलं आवडत नाहीत, ती फार गोंगाट करतात, नुसती किंचाळतात’, असं म्हणणारे अनेकजण आपण पाहिले असतील. पण, मुळात ही लहान मुलं का किंचाळतात याचा विचार केला आहे? सहसा मोठ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधायचं असल्यास लहान मुलं आधी रडतात आणि नंतर किंचाळण्यास सुरुवात करतात. (small kids screaming reason will shock you)

मुलात मूल किंचाळणं ही बाब चुकीची नाही. कारण, या वाटे त्यांचा भावनिक विकास होत असतो. अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्‍सच्या मते लहान मुलं किंचाळण्यावाटे त्यांच्या भावना व्यक्त करत असतात.

तणाव आणि चिडचीड
कधीही आपल्या मनाजोगं काही न घडल्यास लहान मुलं किंचाळण्यास सुरुवात करतात. काही मुलं शारीरिक आणि मानसिक तणाव असतानाही किंकाळ्या फोडचाच. भूक लागणं, थकवा येणं, आजारपण किंवा दुखणं असल्याच हा प्रकार पाहायला मिळतो. कुतूहलापोटी किंचाळणं
काही मुलं इतकी खोडकर असतात की आपण किंकाळी फोडल्यावर नेमकं काय होतं इतकंच काय ते त्यांना पाहायचं असतं.

पालकांनी अशा वेळी काय करावं?
मुलांचं किंचाळण्याचं प्रमाण अधिक असल्यास सर्वप्रथम पालकांनी त्यांच्या प्रकृतीवर लक्ष द्यावं. त्यांचा कोणता अवयव दुखत नाहीय ना, हे पाहावं. वेळप्रसंगी मुलांचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करावं.

मुलांना कसला तणाव?
आता तुम्ही म्हणाल या लहान मुलांना कसला ताणतणाव? तर असं नाहीये. आपल्याकडे कमी लक्ष दिलं जातंय किंवा आपल्याहून इतर कुणाला जास्त प्रेम मिळत असल्याचं दिसल्यास मुलं मनातून खचतात. त्यामुळं त्यांना कधीही एकटं पडून देऊ नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *