मुंबईत कोरोनाने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

मुंबई शहरात कोरोनाची (Coronavirus) रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबईत गुरुवारी आणि शुक्रवारी 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळले. त्यापैकी फक्त 110 जणांना ऑक्सिजन खाटांची गरज लागली. 1180 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. दरम्यान, चेंबूर येथील एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. (Coronavirus: Death of a police officer in Mumbai)

देवनार पोलीस ठाणे येथे सेवा बजावणारे 57 वर्षांचे पीएसआय पोलीस अधिकारी (टिळकनगर, चेंबूर) यांना काल दुपारी अचानक छाती दुखीचा त्रास होऊ लागल्याने वाशीतील MGM hospital येथे दाखल केले होते तेथे उपचार दरम्यान मृत्यू झाला.त्यांची Covid test positive आली होती. त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी त्यांच्यासोबत हजर होते.

मुंबईत दररोजची रुग्णसंख्या 20 हजारांच्या पुढे गेल्यास लॉकडाऊनबाबत विचार करण्यात येईल, अशी भूमिका घेणाऱ्या मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी आता मात्र लॉकडाउनची तूर्तास गरज नसल्याचे स्पष्ट केले असले तरी कठोर निर्बंधांची गरज आहे. तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही कोविडचे नियम पाळावेच लागतील, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहेत. आता ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाली आहे. राज्यात आणि मुंबईत निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई आणि पुणे या दोन महानगरांत मोठ्या प्रमाणत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईबद्दल बोलायचे झाले तर, शुक्रवारी येथे 20971 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, 8490 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईतही शुक्रवारी 6 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *