दहा दिवसात ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा उघड करणार
कोरोना विषाणुने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याने आरोग्य व्यवस्थेसमोर नवीन आव्हानं निर्माण झाली आहेत. रुग्णांची संख्या वाढत असल्यानं पुन्हा एकदा कोविड सेंटर सुरू करावे लागत आहेत. याच कोविड सेंटरच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण पेटण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे. पुढच्या १० दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर (Covid Center) घोटाळा उघड करणार असल्याचा इशारा सोमय्यांनी दिला आहे. कोविड सेंटर हे सत्ताधारी नेत्यांचं कमाईचं साधन असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.किरीट सोमय्या यांनी मागच्या काळात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. शेलार यांच्या आरोपांनंतर राजकारण ढवळून निघालं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी कोविड सेंटर घोटाळा उघड करण्याचा इशारा दिल्याने आता सत्ताधारी नेमकी काय प्रतिक्रीया देतात हे पाहावं लागणार आहे.दरम्यान, महापौर किशोरी पेडणकर यांनी यावेळी आपण ग्राऊंडवर जाऊन परिस्थितीची पाहणी करण्यास प्राधन्य देतो, खुर्चीत बसून बोलणं सोपं असतं, प्रत्यक्ष कमा करून दाखवा असं म्हणत त्यांनी किरीट सोमय्या यांना टोला लगावला आहे. पेडणेकरांनी विरोधकांच्या टीकेला जारदार प्रत्यूत्तर दिलं आहे. किरीट सोमय्या यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्या म्हणाल्या, कावीळ झाल्यानंतर सर्वांना पिवळं दिसतं.