माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती च्या आंदोलनाला यश….

प्रतिनिधी:- विजय पाटील

नांदणी येथील गणेश बेकरीत युनिक सिक्युरिटीचे गार्ड काम करत असताना त्यांना 13 जणांना अचानक कामावर येऊ नका असे सांगण्यात आले.त्यांना याच्या अगोदर कोणतेही पूर्व कल्पना न देता कामावर येऊ नका म्हणून सांगण्यात आले त्या कामगारांनी विचारणा केली असता त्याना सांगण्यात आले की तुमचे वय हे 45 च्या पुढे आहे या कामगारांना कामावर घेताना त्याचे ओरिजनल कागदपत्र घेण्यात आले होते त्यामध्ये आधार कार्ड, पॅनकार्ड हे त्या कंपनी ने त्याचेकडून 2 महिने झाले घेतले होते,त्यामध्ये त्या कामगारांचे कंपनीला वय दिसले नाही का ? व त्या कंपनीत 45 वय असणारे कामगार काम करत आहेत त्यांना त्यांनी काढले नाही फक्त त्या 13 जनाना कामावरून काढण्यात आले याच अनुषंगाने यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती याच्या वतीने गणेश बेकरी समोर 2 दिवस ठिय्या आंदोलन व आज पासून आमरण उपोषन करण्यात आले होते या आंदोलना ची युनिक सिक्युरिटी चे मॅनेजमेंट चे पदाधिकारी यांनी दखल घेत कामगारांच्या मागण्या मान्य करून हे उपोषन मागे घेण्याची विनंती करण्यात आली व येत्या 10 दिवसात कामगारांना त्याचा पगार देण्यात येईल असे लेखी पत्र देन्यात आले आहे.

त्यामुळे हे उपोषन स्थगीत करण्यात आले यावेळी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. सतिश मोटे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा. रवींद्र कांबळे,तालुकाध्यक्ष अजय हराळे,तालुका कार्याध्यक्ष मा. रोहित कांबळे,दलित सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मा.श्रीकांत शिगाई,वाहिद ऐनापुरे व कामगार वर्ग मोठ्या संखेने संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *