मानेचा काळवंडलेपणा 10 रुपयांहून कमी किमतीत दूर करा
सुंदर मी होणार, असं म्हणत अनेकजण घरच्या घरी, घरातल्याच साहित्यानं सौंदर्य आणखी खुलवण्याचं काम करतात. सुंदर कोणाला दिसायचं नसतं. पण, या सौंदर्यातही काही अशा गोष्टी असतात, ज्यामुळं बऱ्याचजणांना संकोचलेपणा वाटतो. मानेचा चेहरा वगैरे नितळ पण, मान काळवंडलेली असेल तर अनेकांचच असं होतं.
(Neck) मान हा शरीराचा एक असा भाग आहे, जो नियमित स्वच्छ न केल्यास तो काळवंडण्यास सुरुवात होते. यासाठी सध्या अनेक स्क्रब आणि इतर साहित्य उपलब्ध आहेत. पण, त्यानंही काहीजणांना फरक पडत नाही. अशावेळी मग घरच्या घरी असणाऱ्या साहित्याकडे मोर्चा वळवला जातो.
Tann म्हणजेच काळवंडलेपणा कमी करण्यासाठी तांदळाचा वापर
सौंदर्य तज्ज्ञांच्या (Beauty Experts) माहितीनुसार मानेवर Dead Skin जमल्यामुळं ती काळी पडण्यास सुरुवात होते. अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळंही मानेवर टॅन जमा होतो. यासाठी तांदळाचं पाणी आणि तांदळाची पेस्ट बरीच मदत करते.
कशी स्वच्छ कराल मान?
(Rice Water) तांदळापासून मान स्वच्छ करण्यासाठी झोपण्यापूर्वी तांदूळ पाण्यात भिजवा आणि सकाळी उठल्यानंतर ते वाटून घ्या. या (Rice Paste) तांदळाच्या पेस्टमध्ये 1 विटामिन-ई कॅप्सूल आणि 1 चमचा कॉफी मिसळा. हे मिश्रण मानेवर लावा आणि 10 मिनिटं ठेवा, त्यानंतर धुवून स्वच्छ करा. यानंतर मानेवर हलक्या हातानं moisturizer लावा. असं केल्यास मानेचा काळवंडलेपणा कमी होईल.
या गोष्टींची काळजी घ्या
एक गोष्ट लक्षात घ्या, की हे मिश्रण मानेवर जोरजोरात चोळू नका. असं केल्यास मानेवरील त्वचेला इजा पोहोचेल. हे मिश्रण मानेवर जास्त वेळ सुकून देऊ नका. शिवाय केसांच्या (Hairs) संपर्कातही हे मिश्रण न आलेलंच बरं. कारण ते केसात अडकल्यास काढताना बऱ्याच अडचणी येतात.