झोपण्याची ‘ही’ स्थिती आहे खूपच घातक

आहार आणि व्यायामासोबतच चांगली झोपही चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. बरेच लोक शांत झोप (sleep peacefully) मिळविण्यासाठी खूप संघर्ष करत असतात. चांगली झोप येण्यासाठी तुमची जीवनशैली खूप महत्त्वाची असते. तुम्ही कधी झोपता आणि कसे झोपता, या सर्व गोष्टी चांगल्या झोपेसाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. अनेकदा झोपताना लोकांना विचित्र स्थितीत झोपलेले तुम्ही पाहिले असेल. प्रत्येक व्यक्तीची झोपण्याची पद्धत (sleeping pattern) वेग-वेगळी असते. काही लोक सरळ झोपतात तर काही लोक पोटावर किंवा पाठीवर झोपतात. त्याच वेळी, काही लोक असे आहेत जे एका बाजूला झोपतात. तुम्ही ज्या स्थितीत झोपता त्याचा तुमच्या आरोग्यावर मोठा प्रभाव (Big impact) पडतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पोटावर, पाठीवर किंवा बाजूला झोपल्याने घोरणे, स्लीप एपनियाची लक्षणे, मान-पाठदुखी आणि इतर आजारांसह दुखण्यात भर पडते.

चुकीच्या स्थितीत झोपल्याने नुकसान
चुकीच्या स्थितीत झोपल्याने झोपेचा त्रास, तणाव वाढणे आणि रक्ताभिसरण खराब होऊ शकते. यासोबतच त्यांनी असेही सांगितले की, झोपेच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती, चयापचय आणि एकाग्रतेवरही खूप वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत, प्रश्न उद्भवतो की झोपण्यासाठी सर्वोत्तम स्थिती कोणती आहे? तज्ज्ञांचे म्हणणे आहे की झोपेसाठी सर्वोत्तम स्थिती ही अशी आहे की, ज्यामध्ये झोपताना तुमचा पाठीचा कणा, डोके आणि नितंब सरळ राहतात आणि त्यांच्यावर कोणताही ताण येत नाही.नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, लहान मुले प्रौढत्वाकडे वाटचाल करत असताना बाजूला, पाठ आणि पोट या तिन्ही स्थितीत समान झोपतात. डॉ. सेंथिल म्हणाले, या सर्वांमध्ये एखाद्याने एका कुशीवर झोपणे किंवा पाठीवर झोपण्याची सवय लावणे आवश्यक आहे.

एका (कुशीवर)बाजूला झोपणे
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, बहुतेक प्रौढ व्यक्ती एका कुशीवर झोपतात. कारण ही स्थिती सर्वात आरामदायक मानली जाते. या स्थितीत पाठीचा कणा सरळ राहतो. अशा स्थितीत झोपल्यास मान, पाठ आणि खांद्याच्या दुखण्यापासून मुक्ती मिळते.

पाठीवर झोपणे
पाठीवर झोपणे ही झोपण्याची दुसरी सर्वात सामान्य स्थिती आहे. या स्थितीत झोपल्याने तुमचा मणका नैसर्गिक स्थितीत राहतो. या स्थितीत झोपल्याने मान, पाठ आणि खांधेदुखीच्या समस्येचा सामना करावा लागत नाही. जर तुम्हाला अॅसिड रिफ्लक्सची समस्या असेल तर ही स्थिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

या स्थितीत झोपणे आहे सर्वात घातक
तज्ज्ञांच्या मते पोटावर किंवा छातीवर झोपणे खूप धोकादायक ठरू शकते. या स्थितीत झोपल्याने तुमच्या फुफ्फुसांवर आणि छातीच्या पोकळीवर खूप दबाव पडतो, ज्यामुळे तुम्हाला श्वास घेणे कठीण होऊ शकते.या स्थितीत झोपताना तुम्ही उशीचा वापर करता तेव्हा ते तुमच्या मणक्याला आराम देऊ शकत नाही. यामुळे तुमच्या पाठीवर आणि मानेवर खूप ताण येतो. याशिवाय पोटावर झोपल्याने रक्तप्रवाह कमी होतो, परिणामी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुमचे हात पाय सुन्न होऊ शकतात. झोपण्याची दुसरी स्थिती जी तुम्ही टाळली पाहिजे ती म्हणजे गर्भाशय स्थिती. गर्भाची स्थिती म्हणजे आईच्या पोटात गर्भासारखे पहुडलेले असणे. ही स्थिती तुमच्या मणक्यासाठी “भयंकर” घातक आहे आणि त्यामुळे पाठीच्या विविध समस्या उद्भवू शकतात.

गर्भवतींसाठी सर्वोत्तम आणि घातक पोझिशन्स कोणत्या
ऑर्थोपेडिक तज्ञांच्या मते, गरोदरपणात एका बाजूला झोपणे अगदी योग्य मानले जाते. याशिवाय गरोदरपणात महिलांनी पोटावर किंवा पाठीवर झोपू नये. जर तुम्ही गरोदर असाल तर तुम्ही एका बाजूला, विशेषतः डाव्या बाजूला झोपावे. डाव्या बाजूला झोपल्याने नाळेपर्यंत आणि बाळापर्यंत रक्त आणि पोषक घटकांचे प्रमाण वाढते. तसेच, जर तुम्हाला पाठदुखीची समस्या असेल तर ही स्थिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरते. तज्ञ असेही म्हणतात की, या स्थितीत झोपल्याने तुमच्या अवयवांवर खूप कमी ताण येतो.गरोदरपणात पाठीवर झोपल्याने तुम्हाला चक्कर येऊ शकते. तसेच, प्लेसेंटा आणि बाळाला योग्य प्रमाणात रक्त आणि पोषक तत्त्वे मिळत नाहीत. याशिवाय या स्थितीत झोपल्याने पाठदुखी, श्वास घेण्यात अडचण, पचनाच्या समस्या आणि रक्तदाब कमी होऊ शकतो. डॉक्टर सेंथिल म्हणाले की, या स्थितीत झोपणे तुमच्यासाठी आणि बाळासाठी वाईट असू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *