जयसिंगपूर येथील अवचितनगर मध्ये नगरपालिकेचा निर्लज्जपणाचा कळस
प्रतिनिधी:- विजय पाटील
(local news) जयसिंगपूर येथील अवचितनगर येथे गटारीचे काम चालू आहे. वारंवार गटारीचे पाणी दारामधून व रोडवरून गटारीचे पाणी ओवर फ्लो होऊन वाहले जाते. वारंवार आणि कित्येक गेल्या वर्षापासून हा त्रास येथील नागरिकांना होत आहे. परंतु नगरपालिकेचे वारंवार दुर्लक्ष करून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. गेल्या अनेक दिवसांपासून लोकांच्यातून तक्रारी येत असताना गटारीचे काम सुरू करण्यात आले आहे. सुरू करण्यात आलेल्या गटारीचे काम हे अर्धवट राहिले असून तसेच पाऊस झाल्यामुळे चक्क गटारीचे पाणी घरातून वाहत आहे.
जयसिंगपूर चे माजी आरोग्य मंत्री राजेंद्र यड्रावकर असताना देखील जयसिंगपूर मधील लोकांच्या वरचं हा नाहक त्रास सहन केला जातो. नगरपालिकेचे गटाराचे काम हे सुरू असलेले अत्यंत चुकीच्या पद्धतीने रखडले जात आहे. अवचित नगर मध्ये गटाराचे पाणी ओवर फ्लो होत आहे हे सांगूनही देखील गटार ही छोटी बांधली जात आहे. नागरिकांच्यातून होत असलेल्या मागणींना नकार दिला जात आहे.घरातून या वाहत असलेल्या पाण्यामुळे घरातील लोकांना धोका झाल्यास जबाबदार कोण…?
अशा या गटाराच्या वाहणाऱ्या पाण्यामुळे घरातील लोकांना जीवितास कोणताही धोका झाल्यास नगरपालिकेतील अधिकारी व मुख्याधिकारी तसेच कॉन्ट्रॅक्टदार जबाबदार राहणार…! असे वक्तव्य घरातील व्यक्तींनी पत्रकारांची बोलताना केले आहे. (local news)
अवचितनगर मधील चालू असलेली गटार ही मोठी बांधण्यात यावी तसे न केल्यास गटारीचे काम थांबवण्यात यावे. अवचित नगर मध्ये राहत असलेल्या नागरिकांना होत असलेला हा त्रास नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी तसेच कॉन्ट्रॅक्टदार यांनी येऊन समक्ष पाहून त्याच्यावर योग्य ते निर्णय करावा. अन्यथा तसे न केल्यास अवचित नगर मधील सर्व नागरिक एकत्र येऊन जयसिंगपूर नगरपरिषदेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.