रोजच्या लाईफमधील या चुकांमुळे डायबिटीस होण्याचा धोका
मधुमेहाचा आजार होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे चुकीचे खाणे आणि दैनंदिन जीवनात अव्यवस्थित राहणे. रोजच्या काही वाईट सवयींमुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो, त्यामुळे काही सवयी बदलून हा आजार टाळता येतो. मधुमेहाचा आजार टाळण्यासाठी त्याची कारणे जाणून घेणे खूप गरजेचे आहे, त्यामुळे जर तुम्हालाही मधुमेह टाळायचा असेल तर येथे सांगितलेली काही कारणे जाणून घ्या.रात्री जेवल्यानंतर – EverydayHealth.com च्या माहितीनुसार, रात्रीच्या जेवणानंतर काहीही खाणे टाळले पाहिजे, कारण आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारे खाल्ल्याने रक्तातील साखर आणि इन्सुलिनमध्ये वाढ होते. इन्सुलिन सेक्रेशन होते ज्यामुळे तुम्ही मधुमेहावर नियंत्रण ठेवू शकत नाही. म्हणून संतुलित आहार घ्या जेणेकरून तुम्हाला मध्यरात्री खाण्याची तल्लफ होऊ नये, तरीही तुम्हाला रात्री उशिरा जेवायचे असेल तर चिप्स, डोनट्स किंवा ट्रिगर फास्ट फूड पदार्थ खाऊ नका, खायचेच असल्यास आरोग्यदायी पदार्थ खा.सकाळी लवकर काहीच न खाणे – न्याहारी म्हणजेच नाश्ता हा संपूर्ण दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार असतो. न्याहारी न केल्याने किंवा टाळल्यास तुम्हाला मधुमेह टाळणे कठीण होऊ शकते. सकाळचा नाश्ता वगळल्याने तुम्ही दुपारपर्यंत उपाशी राहता. त्यामुळे इंसुलिनची पातळी आणि रक्तातील साखर नियंत्रित राहत नाही. रक्तातील साखरेचे नियंत्रण आणि वजन कमी करण्यासाठी संतुलित नाश्त्यासाठी वेळ काढाच. नाश्त्यामध्ये अंडी, ताजी फळे, दही, रोटी हे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात.साखरयुक्त पेय- गोड चहा आणि गोड सोडा किंवा कोणतेही साखरयुक्त पेय नियमितपणे प्यायल्याने तुमचे वजन वाढू शकते आणि तुम्हाला मधुमेह होऊ शकतो. तहान लागली तर पाणी प्या. कमी चरबीयुक्त दूध देखील तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो आणि फळांचा रस कमी प्रमाणात प्या, त्याऐवजी फळे खा.इमोशनल इटिंग – जेव्हा तुम्ही भावनिक किंवा नैराश्यात असता, तेव्हा तुम्ही तुमच्या आरोग्याची नीट काळजी घेऊ शकत नाही आणि जास्त अन्न खाऊ शकता ज्यामुळे मधुमेह आणि वजन वाढू शकते.