हजारो भारतीयांचा Data leak, खासगी माहिती या वेबसाइटवर शेअर
एका सरकारी सर्व्हरमधून कोविड-19 (corona virus) शी संबंधित पर्सनल डेटा लीक (data leak) झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. लीक झालेल्या डेटामध्ये जवळपास वीस हजार भारतीय लोकांचे मोबाइल नंबर, पत्ते आणि कोविड टेस्टच्या निकालांचा समावेश आहे. हा डेटा रेड फोरम (Red Form) च्या वेबसाइटवर विक्रीसाठी शेअर करण्यात आला आहे.
सायबर तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगार या डेटाचा वापर चुकीच्या कामांसाठी करू शकतात. रेड फोरमवर शेअर केलेला नमुना दस्ताऐवज पाहून लक्षात येते, की हा डेटा कोविन पोर्टलवर (Covin Portal) अपलोड करण्यासाठी ठेवण्यात आला होता.
भाषा न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, रेड फोरमवर उपलब्ध डेटामध्ये मोठ्या प्रमाणात खासगी माहिती आहे. लोकांचा कोविड-19 रिपोर्ट (Covid-19 Report)चा रिझल्ट, नाव, वय, लिंग, मोबाइल नंबर, पत्ता आणि तारीख यासारखी माहिती आहे. सायबर सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर राजहरिया यांनी ट्विटमध्ये माहिती दिली की, पर्सनली आयडेंटिफिएबल इंफॉर्मेशन (PII) ज्यामध्ये नाव आणि कोविड -19 रिझल्टचाही समावेश आहे. एका कंटेट डिलिव्हरी नेटवर्क (CDN) च्या माध्यमातून हा डेटा सार्वजनिक करण्यात आला आहे.
गुगलकडून डेटा इंडेक्स
राजशेखर राजहरिया म्हणाले, की Google ने प्रभावित झालेल्या सिस्टिममधून लाखोंचा डेटा इंडेक्स केला आहे. गुगलने जवळपास नऊ लाख सार्वजनिक, खासगी सरकारी कागदपत्रांना सर्च इंजिनमध्ये क्रमबद्ध केले आहे. रुग्णांचा (corona virus) डेडा आता ‘डार्कवेब’ (Dark Web) वर सूचिबद्ध केला आहे. तो वेगाने हटवण्याची गरज आहे. सरकारने कोविड -19 महामारी आणि लसीकरण कार्यक्रमासंदर्भात जनजागृती करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानावर खूप जास्त विश्वास ठेवला आहे. अनेक सरकारी विभाग कोविड -19 संबंधित सेवा आणि सूचनांसाठी आरोग्य सेतू एपचा वापर करण्यासाठी बाध्य करतात.
सावध राहण्याची गरज
राजहरिया यांनी २० जानेवारीला एक ट्विट केले, त्यात ते सांगतात, की लोकांनी आता सावध राहण्याची गरज आहे. लोकांचा खासगी डेटा डार्क वेबवर विक्री केला जात आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला अनोळखी कॉल आला असेल, आणि तो कोविड-19 संदर्भात काही ऑफर देत असेल, तर त्यांच्या जाळ्यात अडकू नका. तसेच तुमची कोणतीही माहिती देऊ नका.