जयसिंगपूर मधील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माहिती अधिकार व मानवाधिकार तसेच झोपडपट्टीधारकांचा मोर्चा यशस्वी
प्रतिनिधी:- विजय पाटील
(local news) गेली अनेक वर्षे जयसिंगपूर शहरातील अतिक्रमित असलेल्या 11 झोपडपट्ट्यांचा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न प्रलंबित आहे या सर्व झोपडपट्ट्यामधील नागरिकांच्याकडून त्यांच्या राहत्या घराचे घरपट्टी, पाणीपट्टी, लाईट बिल आकारले जाते परंतु त्या घरावर त्यांचा कोणत्याही प्रकारचा हक्क नाही सन 1995 च्या शासन निर्णयाप्रमाणे तसेच सुधारित शासन निर्णय 2002 व 2011 च्या आतील सर्व झोपडपट्टीधारकांची नियमिती करून त्यांना प्रॉपर्टी कार्ड द्यावे हा शासन निर्णय असताना देखील आज तागायत त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळालेले नाही तसेच जयसिंगपूर नगरी ही व्यापारी पेठ असल्यामुळे आसपासच्या भागातील अनेक नागरिक या ठिकाणी काही ना काही व्यवसायासाठी या ठिकाणी येऊन भाडेकरू म्हणून गेली 20 ते 25 वर्षे होऊन अधिक काळ राहत आहेत व आपला उदरनिर्वाह चालवीत आहेत.
त्यांनाही म्हाडासारखा प्रकल्प डोळ्यासमोर ठेवून किमान 500 स्क्वेअर फुट च्या जागेवर हक्काचे घर मिळावे व संपूर्ण झोपडपट्टी भाग पुनर्वसन करून त्यांना त्यांचे प्रॉपर्टी कार्ड मिळावे यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मानवाधिकार व माहिती अधिकारी विभाग तसेच माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, शिरोळ च्या मेन गेटवरून तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला,झोपडपट्टी धारकाना प्रॉपर्टी कार्ड मिळालेच पाहिजे, जयसिंगपूर शहर भाडेकर मुक्त झालेच पाहिजे, अशा प्रकारच्या घोषणानी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. (local news)
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मानवाधिकार व माहिती अधिकार विभागाचे पश्चिम महाराष्ट्र सेक्रेटरी , माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश मोटे ,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे, पत्रकार विजय धंगेकर ,निर्भीड पत्रकार रोहित जाधव, पत्रकार विजय पाटील, आरपीआयचे युवा आघाडी शहर अध्यक्ष सचिन कांबळे, सामाजिक कार्यकर्ते दीपक शेडबाळे, अक्षय गोसावी, संजय सातव, राखी रजपूत व झोपडपट्टीतील शेकडो अतिक्रमणधारक उपस्थित होते.