जयसिंगपुरात कर्नाटक सरकारविरोधात तीव्र नाराजी

कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्र पासिंग असणाऱ्या मालवाहू 6 ट्रक्सवर दगडफेक (stone throwing) केल्याची घटना पुणे- बंगळूर महामार्गावरील हिरेबागेवाडी ( जि. बेळगाव ) येथील टोलनाक्यावर आज घटना घडली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसेस मात्र कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभर सर्रासपणे फेऱ्या करून उत्पन्न मिळविण्यात येत आहे. एकीकडे महाराष्ट्र राज्यातील वाहने फोडायची मात्र कर्नाटकच्या बसेस महाराष्ट्रात कशा फिरतात, असा सवाल करत नागरिकांमधून कर्नाटक सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

बेळगावजवळ महामार्गावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या ट्रक्सवर दगडफेक (stone throwing) करण्यात आली. जवळपास ६ ट्रक्‍सवर दगडफेक करून शाहीफेक करण्यात आली आहे. यामुळे सीमाभागात संतापाची लाट उसळली आहे. तर महाराष्‍ट्राच्या मंत्र्यांना कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकात प्रवेश द्यावयाचा नाहीच, यावर कर्नाटक सरकार ठाम आहे. याचाच एक भाग म्हणून खबरदारी घेत सीमाभागातील २१ तपासणी नाक्यांवर खडा पहारा ठेवला आहे. अशातच महाराष्ट्र राज्यातील वाहनांची कर्नाटक राज्यात तोडफोड केल्याने संतापाची लाट उसळली आहे.

कर्नाटक राज्यातील विजयपूर, बेळगाव, बागलकोट, कलबुर्गी, धारवाड, कारवार, गदग, यासह अन्य जिल्ह्यातील असलेल्या इंडी, सिंदगी, तालिकोट, अथणी, चिक्कोडी, निपाणी, रायबाग, विजयपूर, मुद्देबिहाळ, गोकाक, रामदुर्ग, बेळगाव, सवदत्ती, जमखंडी, इरकल, मुधोळ, बदामी, बिळगी यासह अन्य आगाराच्या एस टी बसेस कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर यासह अन्य जिल्ह्यातील अनेक शहरात बस फेऱ्या आहेत.

महाराष्ट्र राज्यातील एस टी बसेसना कर्नाटक राज्यातील बसस्थानकावर जागा न देणे, महाराष्ट्र एस टी समोर कर्नाटक बसेस लावून त्यामधून प्रवाशी घेणे, असे प्रकार होतात. बेळगाव येथील घटनेने महाराष्ट्र राज्यात संपताची लाट उसळली असतानाच कर्नाटक बसेस मात्र महाराष्ट्र फेऱ्या करीत आहेत. जयसिंगपूर येथील बसस्थानकातून मुद्देबिहाळ आगाराची रत्नागिरी बस मंगळवारी दुपारी रत्नागिरीकडे रवाना झाली. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *