सुप्रिया सुळे यांच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात ठाकरे गट आक्रमक

 महाविकास आघाडीच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीमधील बिघाडी पुन्हा एकदा समोर आली आहे. संसदेच्या दालनातच महाविकास आघाडीमधील मतभेद समोर आले आहेत. आज कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा प्रश्न तसेच राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी महाविकास आघाडीचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार होते. महाविकास आघाडीमधील खासदारांची अमित शाह यांच्यासोबत बैठक होती. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटातील दोन खासदारांना या बैठकीत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र ठाकरे गटाकडून सुप्रिया सुळे यांच्या या निर्णयाला विरोध झाला.

ठाकरे गटाकडून विरोध 

सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. तर दुसरीकडे राज्यपाल भगतंसिह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण देखील तापले आहे. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या खासदारांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होती.  या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाच्या खासदारांना सोबत नेण्याचा प्रयत्न केला, मात्र या निर्णयाविरोधात ठाकरे गटाचे खासदार आक्रमक झाले. त्यांनी शिंदे गटाच्या खासदारांना सोबत घेण्यास विरोध केला. ठाकरे गटाच्या विरोधानंतर या खासदारांना अमित शाह यांच्या दालनाबाहेरच थांबावे लागले.

शिंदे गटाचे खासदार दालनाबाहेर

  सुप्रिया सुळे यांनी आजच्या बैठकीमध्ये शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ठाकरे गटाच्या खासदारांकडून जोरदार विरोध झाला. ठाकरे गटाकडून विरोध होत असल्यानं अखेर  धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे यांना अमित शाह यांच्या दालनाबाहेरच  थांबावे लागले. यामुळे पुन्हा एकदा महाविकास  आघाडीमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *