कॅप्टनसीची शर्यत वाढली, आणखी एक दिग्गज जबाबदारीसाठी सज्ज

(sports news) दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या पराभवानंतर विराट कोहलीनं (Virat Kohli) टेस्ट टीमच्या कॅप्टनपदाचा राजीनामा दिला. नव्या कॅप्टनची नियुक्ती अद्याप झालेली नाही. विराटचा उत्तराधिकारी म्हणून रोहित शर्माचं (Rohit Sharma) नाव सर्वात आघाडीवर आहे. पण, त्याचवेळी त्याच्यासमोर अनेक स्पर्धक देखील आहेत. काही दिवसांपूर्वी फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने कॅप्टनपदासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं होतं. आता त्यानंतर आणखी एका दिग्गज खेळाडूनं ही जबाबदारी घेण्यासाठी सज्ज असल्याचे जाहीर केले आहे.

टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी (Mohammed Shami) कॅप्टनपदाच्या शर्यतीमध्ये दाखल झाला आहे. ‘मी यावेळी कॅप्टनपदाचा विचार करत नाही. पण, मला जी जबाबदारी देण्यात येईल त्यासाठी मी तयार आहे. खरं सांगायचं तर कोणत्या खेळाडूला भारतीय टीमचं कॅप्टन व्हायला आवडणार नाही? पण ही एकमेव जबाबदारी नाही मी टीमसाठी सर्व प्रकारचे योगदान देण्यासाठी सज्ज आहे.’ असे शमीनं ‘इंडिया डॉट कॉम’ शी बोलताना सांगितले.

मोहम्मद शमी गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा महत्त्वाचा सदस्य आहे. आपण सर्व प्रकारच्या फॉर्मेटसाठी खेळण्यास तयार असून निवडीसाठी उपलब्ध आहोत असे बंगालच्या या फास्ट बॉलरनं सांगितलं. शमीनं दक्षिण आफ्रिका विरूद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये 14 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर शमीला विश्रांती देण्यात आलेली आहे. वेस्ट इंडिज विरूद्ध 6 फेब्रुवारी रोजी सुरू होणाऱ्या मालिकेतही शमीला विश्रांती देण्यात आली आहे. (sports news)

भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यात 3 वन-डे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका होत आहे. या मालिकेची सुरूवात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. रोहित शर्माचं (Rohit sharma) दुखापतीनंतर टीममध्ये पुनरागमन झालं असून तो टीमचं नेतृत्त्व करेल. तर केएल राहुल (KL Rahul) व्हाईस कॅप्टन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *