आता नियम तोडल्यास 500 नाही तर इतका दंड

रस्ते अपघात कमी करण्यासाठी वेळोवेळी वाहतूक विभागाकडून वेळोवेळी सूचना दिल्या जातात. तसेच या अपघातांना आळा घालण्याच्या उद्देशाने नियम केले जातात. मात्र त्यानंतरही काही बेजबाबदार वाहनचालक या नियमाचं (rules) पालन करत नाहीत. त्यामुळे आता सरकारने मोटर वाहन अधिनियमनुसार दंड रक्कमात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगाल सरकारने हा निर्णय घेतला आहे. अधिसूचनेत याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने 2019 मध्येच दंडाच्या रक्कमेत वाढ केली होती. मात्र सर्वसामांन्याना वाढीव दंडाचा भुर्दंड बसू नये, यासाठी आतापर्यंत वाढ करण्यात आली नव्हती, असं (CM Mamata Banerjee) ममता बॅनर्जी सरकारकडून सांगण्यात येत आहे.

500 च्या जागी थेट 5 हजार रुपये दंड

राज्य परिवहन विभागाने याबाबत मंगळवारी अधिसूचना जारी करण्यात आली. त्यानुसार आता विना परवाना गाडी चालवल्यास 500 ऐवजी 5 हजार रुपये दंड द्यावा लागेल. तसंच बेजबाबदारपणे गाडी चालवल्यास 4 हजार रुपये दंड द्यावा लागेल, जो आधी 400 रुपये इतका होता.

नियमाचं (rules) उल्लंघन केल्यास 500 ते 1 हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागेल. तसेच वाहन विमा (vehicle insurance) नसल्यास 2 हजार तर वेगमर्यादेचं उल्लंघन केल्यास 5 हजार रुपयांचा फटका बसेल.

अधिसूचनेनुसार, विना रोड परमिटशिवाय गाडी चालवल्यास 10 हजार तसेच नोंदणी नल्यास 5 हजार रुपये मोजावे लागतील. विना हेल्मेट बाईक चालवल्यास 1 हजार रुपये दंड द्यावा लागेल. तसेच शांतता क्षेत्रात (Silent Zone) हॉर्न वाजवल्यास 2 ते 4 हजार रुपयांचा दंड द्यावा लागेल. त्यामुळे दंड भरुन खिसा हलका करायचा की सुजान नागरिकासारखं नियमाचं पालन करायचं, हे तुम्हीच ठरवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *