माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती मॅरेथॉन स्पर्धेत प्रवीण कांबळे प्रथम
(sports news) शिरोळ प्रतिनिधी शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते व श्री दत्त उद्योग समूहाचे शिल्पकार माजी आमदार स्व डॉ आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील यांच्या ८ पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या सद् भावना दौड तथा मॅरेथॉन स्पर्धेत सांगलीच्या प्रवीण कांबळे यांने प्रथम क्रमांक मिळवला.
कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या मान्यतेने माजी आमदार स्व डॉ आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फौडेंशन यांच्या वतीने या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पारंभी येथील श्री दरगोबा अर्थमूव्हर्स व ट्रान्सपोर्ट कार्यालयात स्व डॉ आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन श्री दत्त उद्योग समूहाचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला शिवाजी चौक ते जिरगे पेट्रोल पंप ते शिवाजी चौक अशी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली.
उपस्थितांचे स्वागत श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक दरगू गावडे यांनी केले. या मॅरेथॉन स्पर्धेत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील असंख्य स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत प्रवीण कांबळे (सांगली) यांने प्रथम अभिषेक देवकाते (कोल्हापूर )याने द्वितीय सिद्धांत पुजारी (कोल्हापूर) याने तृतीय क्रमांक मिळवला प्रथम क्रमांकाचे ७००१ रुपये पारितोषिक हैदरअली मेस्त्री द्वितीय क्रमांकाचे ५००१ रुपये पारितोषिक देवाप्पा पुजारी तृतीय क्रमांकाचे ३००१ रुपये पारितोषिक स्वप्निल पाटील यांच्याकडून देण्यात आले. तर सर्व विजेत्या व सहभागी स्पर्धकांना तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष दिलीपराव माने यांचेकडून सन्मानचिन्ह व मेडल देण्यात आले. (sports news)
यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव नगरसेवक पंडित काळे योगेश पुजारी माजी सरपंच गजानन संकपाळ शिवाजीराव माने देशमुख माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील आप्पासाहेब गावडे दिलीपराव माने उद्योजक अभिजीत माने हैदरअली मेस्त्री देवाप्पा पुजारी सर्जेराव पाटील बाळासाहेब कोळी बापूसाहेब गंगधर गुरुदत्त देसाई अमर शिंदे उदय संकपाळ (शिलेदार) नरेंद्र माने लियाकत सय्यद शक्तीजीत उर्फ चिकू गुरव अमर उर्फ नाना कदम अभिजीत गावडे निलेश गावडे नवनाथ पुजारी संदीप शहारे अब्दुल खलीफ ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्था श्री माऊली दत्तगुरु क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्था व कै पी के माने क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्थांचे पदाधिकारी सभासद शिरोळ परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर स्व आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील फौडेंशनचे कार्यकर्ते व दत्त उद्योग समूहातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन परवेज मेस्त्री यांनी केले आभार निलेश गावडे यांनी मानले