महाराष्ट्रात कोरोनाबाधितांमध्ये मोठी घट,

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. सोमवारी राज्यात कोरोनाचे 15,140 नवीन रुग्ण आढळून आले, हे एका दिवसापूर्वी नोंदवलेल्या रुग्णांपेक्षा 7304 कमी आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. सोमवारी राज्यात कोरोना विषाणूचे 15,140 नवीन रुग्ण आढळून आले, हे एका दिवसापूर्वी नोंदवलेल्या रुग्णांपेक्षा 7304 कमी आहेत. तर, आणखी 39 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 77 लाख 21 हजार 109 वर पोहोचली आहे, तर राज्यात 1 लाख 42 हजार 611 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 35,453 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्य विभागाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत 73,67,259 लोक बरे झाले आहेत. तर, महाराष्ट्रात सध्या 2,07,350 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. याशिवाय सोमवारी ओमायक्रॉन प्रकाराच्या नवीन 91 रुग्णांची नोंद झाली आहे. या आकडेवारीनंतर राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या एकूण 3221 झाली असून त्यापैकी 1,682 रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 3762 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 7953 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 14 जणांचा मृत्यू झाला. तर, पुण्यात एकुण सक्रिय रुग्णांची संख्या 59 हजार 204 वर पोहोचली आहे. त्यापैकी 56 हजार 887 प्रकरणे होम आयसोलेटेड आहेत. तसेच आतापर्यंत 19 हजार 475 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 960 रुग्ण आढळले आहेत. यात लक्षणे नसलेली 835 रुग्ण आहेत. मुंबईत आतापर्यंत नोंद झालेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 47 हजार 590 वर पोहोचली आहे. सोमवारी नोंदवलेल्या रुग्णांपैकी 106 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी 30 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. पालिकेने सांगितले की, मुंबईत सध्या 2215 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत, त्यापैकी 973 ऑक्सिजनवर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *