जेवण योग्य प्रमाणात कसे खावे? न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितला 3:2:1 चा फॉर्मुला

लठ्ठपणापासून मुक्त होण्यासाठी प्रत्येकजण बरेच प्रयत्न करत असतात. कधी जिममध्ये एक्सरसाइज तर कधी स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतात. परंतु काहीवेळा त्यानंतरही इच्छित परिणाम साध्य करण्यात अपयशी ठरतो. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट (Nutritionist) ऋजुता दिवेकरने यावर एका वाक्यात उत्तर दिलं आहे. ऋजुता दिवेकर म्हणते की, आपण योग्य प्रमाणात खात नसल्यामुळे असे होते. कधीकधी, आपण एकतर खूप कमी खातो किंवा आपल्या आहारातून आवश्यक पदार्थ काढून टाकतो. म्हणून, तज्ज्ञ म्हणतात की, अनेकदा मूड खराब असेल तर बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. त्वचा किंवा केसांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. अशावेळी काळजी न करता ऋजुता दिवेकरने सांगितलेल्या टिप्स फॉलो करा.

काय आहे 3:2:1 चा फॉर्मुला

(Nutritionist) ऋजुता दिवेकरने योग्य खाण्यावर हा फॉर्मुला सांगितला आहे. यामध्ये 3:2:1 चा फॉर्मुला सांगितला असून यानुसार जेवण केल्यास तुमचे आरोग्य सुदृढ राहते. यामध्ये तुमच्या ताटात ५०-३५-१५ असा देखील फॉर्मुला वापरू शकतात. यामध्ये ५० टक्के भाकरी किंवा चपतीचा सहभाग करू शकता. यानंतर ३५ टक्के डाळ किंवा भाज्यांचा समावेश करू शकता आणि १५ टक्के सलाड, पापड, लोणच्याचा सहभाग करा. पण प्रत्येक गोष्ट किती प्रमाणात खावी हे अतिशय महत्वाचं आहे.

​जेवणाच्या ताटाची साईज किती असावी?

प्रत्येक घरात लहान मुलांच ताट छोटं असतं. तर मोठ्या व्यक्तीचं ताट मोठं असतं. पण यापेक्षा तुम्ही आहारात पदार्थ किती प्रमाणात घेता हे महत्वाचं आहे. त्यामुळे मोठी व्यक्ती आहात म्हणून भरपूर न खाता वरील ५०-३५-१५ चा फॉर्मुला फॉलो करा.

​मांसाहार किती करावा?

निरोगी आरोग्यासाठी शाकाहारी असावं की मांसाहारी हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. वाईट काहीच नाही पण त्याचे प्रमाण योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. जर ३५ टक्क्यांमध्ये मांसाहार असेल तर तो योग्य प्रमाणात आहे. पण अनेकजण मांसाहारच १०० टक्के करतात तर ते चुकीचे आहे.

​​​५० टक्क्यात काय येते?

तुमच्या राज्यात काय धान्य पिकते त्याचा समावेश यामध्ये येतो. जसे की, तांदळ, नाचणी, ज्वारी, बाजरी आणि असंख्य धान्य. गहू म्हणजे चपातीचा देखील यामध्ये समावेश येतो.

​३५ टक्क्यात काय येते?

सगळ्या प्रकारच्या डाळीचा यामध्ये समावेश होतो. ६५ हजार डाळींचा प्रकार आढळतो ते सगळे यामध्ये येते. तसेच सगळ्या शिजवलेल्या भाज्या आणि मांसाहाराचा समावेश देखील यामध्ये येतो.

​​१५ टक्क्यात काय येते?

कच्चा सलाड, दही, ताक, पापड, लोणचे यामध्ये येते. त्यामुळे त्याचे प्रमाण देखील आहारात तेवढेच असणे गरजेचे आहे.

गोडाचा समावेश किती असावा?

गोडाचे प्रमाण फार कमी असावे. सणावारांना फक्त गोडाचे पदार्थ खावेत. भारतीय संस्कृतीनुसार ताटात गोडाचे पदार्थ हे मध्यावर असतात. त्यामुळे ते तेवढ्याच प्रमाणात खाणे गरजेचे असते.

​​५ फायदे काय होतात?

तुमची पचनशक्ती सुधारते
शरीरासाठी उत्तम पोषणतत्वे मिळतात
उत्तम त्वचा आणि केस होतात
शौचाला जाऊन आल्यावर अतिशय हलके वाटते
जेवल्यावर गोड किंवा अनेकांना स्मोकिंग करण्याची सवय असते त्याची गरज भासत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *