युझर्स आनंदाने नाचतील, व्हॉटसॲप आणणार हे जबरदस्त फीचर
आपण वेगाने डिजिटल युगात प्रवेश केला आहे. त्यामुळे अनेक कामे घरबसल्या सहज एका क्लिकवर होत आहे. यामधील काही कामे तर व्हॉट्सॲपमुळे (WhatsApp Features) अगदी चुटकीसरशी होतात. व्हॉटसॲप युझर्ससाठी वेळोवेळी नवनवीन फीचर आणते. त्यामुळे वापर सोपा होतो. आताच व्हॉट्सॲपने मॅसेज एडिट (Message Edit) करण्याचे महत्वाचे फीचर वापरकर्त्यांच्या हाती दिले आहे. त्यामुळे अवघ्या काही मिनिटात तुम्ही केलेली चूक सुधारता येणार आहे. व्हॉटसॲपने युझर्ससाठी अजून एक खास फीचर आणले आहे. आतापर्यंत व्हॉट्सॲपने अनेक फीचर्स रोल आऊट केले आहे. त्याचे युझर्सनी स्वागत केले आहे. या फीचरमुळे युझर्सच्या उड्या पडणार आहेत.
‘कॉल बॅक’चा पर्याय
व्हॉटसॲपने वापरकर्त्यांसाठी ‘कॉल बॅक’चा पर्याय आणला आहे. हे फीचर लवकरच युझर्ससाठी उपलब्ध होईल. याआधारे वापरकर्त्यांना मिस्ड व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलसाठी कॉल बॅक पर्याय लवकरच उपलब्ध होईल.मिस्ड कॉल डिटेल्स लागलीच युझर्सला कळतील. यासंबंधी पॉपअप येईल. वापरकर्त्याला कॉलबॅक करता येईल. या नवीन फीचरसाठी व्हॉटसॲप अपडेट करण्यात येईल.
WABetainfo ने याविषयीचा एक स्क्रीनशॉट पण शेअर केला आहे. त्यामध्ये कॉल बॅकचा पर्याय स्पष्टपणे दिसत आहे. मेसेजमध्येच मिस्ड कॉल डिटेल्ससोबत,काही इमेज दाखवून कॉल बॅक पर्याय कसा असेल याची माहिती देण्यात आली आहे. या कॉल बॅक पर्यायाला क्लिक करताच, ज्याने कॉल केला होता. त्याला पुन्हा कॉल जोडण्यात येईल. व्हॉटसॲप कॉलद्वारे त्या व्यक्तीला थेट संपर्क करता येईल.
निवडक वापरकर्त्यांकडे फीचर
या नवीन फीचरची चाचणी सुरु आहे. हे फिचर (Features) सध्या बीटामध्ये उपलब्ध आहे. कॉलबॅकचे हे फीचर निवडक बीटा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. चाचणीचा टप्पा पार पाडल्यानंतर ते सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल. या चाचणीदरम्यान, बग, तांत्रिक चुका, इतर तांत्रिक अडचणींचा अडथळा दूर करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच हे पण फीचर तुमच्या मोबाईलच्या लेटेस्ट WhatsApp मध्ये उपलब्ध होईल.
बँकिंग सेवा एका क्लिकवर
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या (SBI) बँकिंग सेवा व्हॉट्सॲप वर सहज उपलब्ध आहेत. त्यासाठी 9022690226 नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करावा लागतो. एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) चॅट बँकिंगसाठी व्हॉट्सॲपची सेवा 7070022222 या क्रमांकावर मिळेल. आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) ग्राहकांना व्हॉट्सॲपची सेवा 8640086400 या क्रमांकावर मिळेल. कोटक महिंद्रा (Kotak Mahindra Hello) सर्व्हिससाठी 9718566655 नंबर वापरता येईल.