क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! टीम इंडिया…

(sports news) क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आयपीएल संपल्यानंतर आता एकापाठोपाठ एक सलग मॅचेस टीम इंडिया खेळणार आहे. वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडिया टी 20 तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे. ऑगस्ट महिन्यात आयर्लंड विरुद्ध हा सामना खेळण्यात येणार असून यामध्ये नव्या खेळाडूंना संधी मिळणार का? याची प्रतीक्षा आहे. लवकरच बीसीसीआय टीम जाहीर करू शकते. सध्या या मालिकेचं शेड्युल समोर आलं आहे.

टीम इंडिया आयर्लंडचा दौरा करणार आहे. भारताच्या आयर्लंड दौऱ्याचं शेड्युल जारी करण्यात आलं आहे. वेळापत्रकानुसार, तीन सामन्यांची T20I मालिका खेळण्यासाठी भारत आयर्लंडला जाणार आहे. 18 ऑगस्टपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे, तर इतर दोन सामने 20 आणि 23 ऑगस्टला होणार आहेत.

क्रिकेट आयर्लंडचे मुख्य कार्यकारी वॉरन ड्युट्रॉम यांनी एका निवेदनात म्हटले आहे. ”12 महिन्यांत दुसऱ्यांदा टीम इंडडियाचं आयर्लंडमध्ये स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही 2022 मध्ये दोन सामने आयर्लंडमध्ये खेळवले होते.

त्यामुळे यावर्षी तीन सामन्यांची मालिका आहे. चाहत्यांना या पेक्षा जास्त सामने पाहण्याची संधी इथे मिळावी आणि त्यांना खूप आनंद घ्यावा अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.” (sports news)

आयपीएलनंतर महिनाभराच्या आणि बहुप्रतिक्षित विश्रांतीनंतर, भारत १२ जुलैपासून सर्व स्वरूपाच्या दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजला पोहोचेल. या दौऱ्यात भारत दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताचा वेस्ट इंडिज दौरा 13 ऑगस्ट रोजी संपणार आहे. यानंतर भारतीय संघ आयर्लंडला रवाना होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *