टीम इंडियाचा ऑल राऊंडहार्दिक पांड्याचा मोठा निर्णय
(sports news) टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टी20 वर्ल्ड कपनंतर टीमच्या बाहेर आहे. हार्दिकच्या फिटनेसचा परिणाम त्याच्या फॉर्मवर झाला. त्यामुळे त्याची टीममधील जागा गेली. त्यानंतर तो टीमच्या बाहेर आहे. हार्दिकला आता आयपीएलमधील अहमदाबाद टीमचा कॅप्टन करण्यात आले आहे. त्याचबरोबर आगामी टी20 वर्ल्ड कप खेळण्याचे त्याचे टार्गेट आहे.
हार्दिकनं या कारणामुळे रणजी ट्रॉफीमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी रणजी सिझनसाठी बडोद्यानं 20 सदस्यीय टीमची घोषणा केली आहे. या टीममध्ये हार्दिकचा समावेश नाही. केदार देवधर या टीमचा कॅप्टन आहे. तर विष्णू सोळंकी व्हाईस कॅप्टन आहे. हार्दिक पांड्यानं रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळावं अशी सूचना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. हार्दिकनं त्याकडे दुर्लक्ष केलं आहे.
‘हार्दिक जखमी होता. त्यामुळे त्याला पूर्ण फिट होण्यासाठी ब्रेक देण्यात आला. तो रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसेल असा मला विश्वास आहे. तो रणजी स्पर्धेत जास्त बॉलिंग करून शरीर फिट करेल, अशी मला खात्री आहे,’ असं मत गांगुलीनं व्यक्त केलं होतं. पण, हार्दिकनं ही स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो आता थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसेल.
हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्या रणजी टीमचा सदस्य आहे. यंदा रणजी स्पर्धा दोन टप्प्यात होणार आहे. आयपीएल स्पर्धेच्यापूर्वी पहिला टप्पा होणार आहे. हा टप्पा 15 मार्चपर्यंत चालेल. त्यानंतर 30 मे ते 26 जूनपर्यंत नॉक आऊट स्पर्धा होणार आहे. यावर्षी 2020 नंतर पहिल्यांदाच रणजी स्पर्धा होत आहे. (sports news)
बडोदा टीम : केदार देवधर (कॅप्टन), विष्णू विनोद, प्रत्यूष कुमार, शिवालिक शर्मा, कृणाल पांड्या, अभिमन्यू सिंह राजपूत, ध्रूव पटेल, मितेश पटेल, लुकमान मेरिवाला, बाबासफीखान पठाण, अतीत शेठ, भार्गव भट्ट, पार्थ कोहली, शाश्वत रावत, सोएब सोपारिया, कार्तिक काकाडे, गुरजिंदरसिंह मान, ज्योतिस्निल सिंह, निनाद राठवा आणि अक्षय मोरे.