21 वर्षीय खेळाडूची तुफानी खेळी ऋतुराजलाही मागे टाकलं
(sports news) क्रिकेटच्या विश्वात मागील काही काळापासून अनेक वेगळेच विक्रम प्रस्थापित होत असल्याचंही पहायला मिळतंय. नुकताच अफगाणिस्तानच्या एका क्रिकेटपटूने असाच एक विक्रम आपल्या नावे नोंदवला असून त्याचा विक्रम पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ‘काबुल प्रीमियम लीग’मधील सामन्यात एका 21 वर्षीय तरुणाने हा विक्रम केला आहे.
पहिलाच नो बॉल
सदिकुल्लाह अटल असं विक्रम करणाऱ्या 21 वर्षीय तरुण फलंदाजाचं नाव आहे. सदिकुल्लाहने एकाच ओव्हरमध्ये तब्बल 48 धावा कुटल्या आहेत. सदिकुल्लाह हा शाहीन हंटर्सच्या संघाकडून खेळत आहे. सदिकुल्लाहने अबासिन डिफेंडर्सच्या संघाविरोधात फलंदाजी करताना एकाच ओव्हरमध्ये तब्बल 7 षटकार लगावले. आमिर जजईच्या ओव्हरमध्ये या अफगाणी फलंदाजाने हा विक्रम स्वत:च्या नावाने नोंदवला. आमिरने टाकलेला पहिलाच चेंडू नो बॉल ठरला. त्यावर सदिकुल्लाहने षटकार लगावला. त्यामुळे शून्य चेंडूमध्ये 7 धावा असा स्कोअर ओव्हरच्या सुरुवातीलाच झाला.
कोणत्या चेंडूला काय झालं?
ओव्हरला वाईट सुरुवात झाल्यानंतर आमिरची लय बिघडली. दुसरा चेंडू त्याने वाईड टाकला. हा चेंडू विकेटकिपरच्या हातूनही सुटला आणि थेट चौकार गेला. अशा पद्धतीने 0 चेंडूमध्ये 12 धावा झाल्या. पहिल्या लिगल डिलेव्हरीवर फलंदाजाने षटकार लगावला. त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवरही सदिकुल्लाहने षटकार लगावले. 6 षटकारांच्या 36 धावा आणि पहिल्या 2 चेंडूंमधील 12 धावा अशा एकूण 48 धावा या फलंदाजाने केल्या. (sports news)
पहिला चेंडू – नो बॉल 6 धावा (एकूण धावा – 7)
पहिला चेंडू – वाइट बॉल 4 धावा (एकूण धावा – 12)
पहिला चेंडू – 6 धावा (एकूण धावा – 18)
दुसरा चेंडू – 6 धावा (एकूण धावा – 24)
तिसरा चेंडू – 6 धावा (एकूण धावा – 30)
चौथा चेंडू – 6 धावा (एकूण धावा – 36)
पाचवा चेंडू – 6 धावा (एकूण धावा – 42)
सहावा चेंडू – 6 धावा (एकूण धावा – 48)
सदिकुल्लाहने केवळ 56 चेडूंमध्ये 118 धावांची तुफानी खेळी केली. यामध्ये त्याने 7 चौकार 10 षटकार लगावले आहेत. काबुल प्रीमियम लीगमधील हा 10 वा सामना होता. सदिकुल्लाह खेळत असलेल्या शाहीन हंटर्सच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 विकेट्सच्या मोबदल्यात 213 धावांचा डोंगर उभा केला. या धावांचा पाठलाग करताना अबासिन डिफेंडर्सच्या संघाला 121 धावांपर्यंत मजल मारता आली. शाहीन हंटर्सने हा सामना 92 धावांनी जिंकला. सदिकुल्लाहने 7 षटकार लगावलेल्या या ओव्हरचा व्हिडीओ ट्वीटरवर व्हायरल झाला आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ…
ऋतुराजचा विक्रम मोडला
सदिकुल्लाहपूर्वी एकाच ओव्हरमध्ये 7 षटकार लगावण्याचा विक्रम भारताच्या ऋतुराज गायकवाडनेही केला आहे. विजय हजारे चषक स्पर्धेमध्ये एका ओव्हरमध्ये ऋतुराजने 7 षटकार लगावले होते. 2022 साली अहमदाबादमध्ये झालेल्या फायनलमध्ये ऋतुराजने ही कामगिरी केलेली.