आज मिशन चांद्रयानसाठी महत्त्वाचा दिवस
आज मिशन चांद्रयान-3 (mission) साठी महत्त्वाचा दिवस आहे. काल चांद्रयान 3 ला चंद्राच्या 153*163 KM कक्षेत स्थापित केलं गेलं. चंद्राच्या कक्षेतील चांद्रयान 3 चे सर्व मॅन्यूव्हर पूर्ण झाल्याची इस्रोकडून काल माहिती देण्यात आली. आज प्रॉपल्शन मॉड्युलपासून लँडर मॉड्युल वेगळ होईल. दोन्ही मॉड्युल स्वतंत्रपणे काम करायला सुरुवात करतील. मिशन चांद्रयान 3 मधील ही एक अवघड आणि महत्त्वाची प्रक्रिया आहे. चांद्रयान-2 मिशनमुळे ही प्रोसेस हाताळण्याचा इस्रोकडे अनुभव आहे. त्यावेळी इस्रोने यशस्वीरित्या लँडिंग मॉड्युलला ऑर्बिटरपासून वेगळं केलं होतं.
लँडिंग मॉड्युलमध्ये विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर आहे. चांद्रयान-3 मध्ये सेप्रेशननंतर लँडिंगच्या फायनल प्रोसेसला जवळपास एक आठवडा लागेल. 23 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगची योजना आहे.
23 ऑगस्टला किती वाजता चंद्रावर लँडिंग होणार?
चांद्रयान-3 चं (mission) चंद्रावर सॉफ्ट लँडिंग 23 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी होऊ शकतं. बुधवारी सकाळी चांद्रयान 3 वर लँडिंगआधीच एक महत्त्वाच मॅन्यूव्हर परफॉर्म करण्यात आलं. चांद्रयान 3 आता चंद्रापासूनच्या अत्यंत जवळच्या कक्षेत आहे. प्रॉपल्शन मॉड्युल आणि लँडर मॉड्युल परस्परापासून वेगळे होण्यासाठी तयार आहेत.
आज किती वाजता होणार सेप्रेशन?
आज 17 ऑगस्टला दुपारी 1 वाजून 8 मिनिटांनी चांद्रयान 3 अंतिम टप्पा पूर्ण करेल. त्यानंतर प्रॉपल्शन मॉड्युलपासूल लँडिंग मॉड्युल वेगळं होईल. हे दोन्ही मॉड्युल चंद्रपासून 100 किमीच्या कक्षेत भ्रमण करतील. यावेळी दोघांमध्ये टक्कर होऊ नये, यासाठी समान अंतर ठेवलं जाईल. 23 ऑगस्टला आता आठवड्याभराचा कालावधी उरला आहे. रोज लँडिंगशी संबंधित एक-एक टप्पा पुढे सरकणार आहे. चंद्रावरच्या घडामोडींची माहिती इस्रोला कशी मिळणार?
17 ऑगस्टला प्रॉपल्शन मॉड्युलपासूल लँडिंग मॉड्युल वेगळं होईल. त्यानंतर लँडिंग मॉड्युलला चंद्राच्या आणखी जवळ नेण्यासाठी थ्रस्टर ऑन केले जातील. त्यानंतर 20 ऑगस्टला सुद्धा असच केलं जाईल. लँडरवर ही प्रोसेस सुरु असताना प्रॉपल्शन मॉड्युलच चंद्राच्या 100*100 KM कक्षेत भ्रमण सुरु राहिलं. सॉफ्ट लँडिंगची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर रोव्हर माहिती लँडरकडे देईल. त्यानंतर ती माहिती प्रॉपल्शन मॉड्युलकवरी इस्रोला मिळेल.