चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे जाणून घ्या जबरदस्त फायदे

प्रत्येकालाच वाटत असतं की आपण सुंदर दिसावं, आपली त्वचा नेहमी तजेलदार आणि चमकदार दिसावी. पण बहुतेक लोकांना स्किनशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मग पिंपल्स, डार्क सर्कल्स अशा अनेक वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत असतो. तर अनेक लोक आपली स्किन (skin) फ्रेश ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करत असतात. पण काही लोकांना त्यांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. तर आता आपण एका अशा घरगुती उपायाबाबत जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमची स्किन फ्रेश राहील आणि स्किनशी संबंधित समस्यांपासून तुमची सुटका होण्यास मदत होईल.

जर तुम्हाला तुमची स्किन टवटवीत ठेवायची असेल आणि तुम्हाला स्किनशी संबंधित समस्यांपासून सुटका हवी असेल तर तुम्ही बर्फाचा वापर करू शकता. सध्या आईस बाथचा ट्रेंड सगळीकडे चालू आहे. बर्फाने चेहऱ्यावरती मसाज केल्यानंतर तसेच आईस बाथ घेतल्यानंतर ते आपल्या स्किनसाठी खूप फायदे फायदेशीर ठरू शकते. विशेष सांगायचं झालं तर आईस बाथला अनेक सेलिब्रेटी देखील फॉलो करत आहेत. तर आता आपण फेस आयसिंग कसं करायचं आणि ते केल्यानंतर काय फायदे होतात याबाबत जाणून घेणार आहोत.

फेस आयसिंग कसं करायचं?
फेस आयसिंग करताना तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर थेट बर्फ लावू शकता किंवा थंड पाण्याने तुम्ही तुमचा चेहरा धुवू शकता. तसेच फेस आयसिंग करताना तुळस, पुदिना किंवा इतर औषधी वनस्पतींचे बर्फाचे तुकडे देखील वापरता येऊ शकता.

चेहऱ्याला होणारे फायदे
1. फ्रेश वाटते – तुम्ही चेहऱ्यावर बर्फाने एक मिनिट मसाज करा यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल आणि तुमची स्किन टवटवीत देखील राहील. तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये (skin) ताजेपणा हवा असेल तर फेस आयसिंग जरूर करा.

2. रक्ताभिसरणात फायदा – तज्ञांच्या म्हणण्यानुसार चेहऱ्यावर बर्फाने नियमितपणे मसाज केल्यानंतर रक्तभिसरणात फायदा होण्यास मदत होते. बर्फाने मसाज केल्यानंतर रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि आपला चेहरा उजळून निघण्यास मदत होते आणि आपला चेहरा फ्रेश देखील दिसतो.

3. चेहऱ्यावरील सूज कमी करते – बहुतेक जणांना त्यांच्या चेहऱ्यावर सूज किंवा फुगीरपणा जाणवतो, तर अशा लोकांनी नियमितपणे फेस आयसिंग केलं पाहिजे. कारण फेस आयसिंग केल्यामुळे चेहऱ्यावरील सूज कमी होण्यास मदत होते. बर्फ हा आपला चेहऱ्याच्या आत असलेल्या रक्तवाहिन्यांमधील सूज कमी करण्यास मदत करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *