भारताने जिंकलं पहिलं गोल्ड! 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड
(sports news) पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल टीम ने आशियाई क्रीडा स्पर्धा २००३ च्या दुसऱ्या दिवशी हँगझोऊ येथे भारतासाठी पहिले गोल्ड मेडल जिंकले आहे. रुद्रांक्ष पाटील, ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर आणि दिव्यांश पंवार यांनी १० मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धा जिंकत यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे.
व्यक्तिगत क्वालिफिकेशन राउंडमध्ये रुद्राक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांश सिंह पंवार आणि ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर या तिघांनी वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घालत हा प्रराक्रम केला आहे. भारताने एकून १८९३.७ इतका स्कोर केला, जो मागील माहिन्यात बाकू वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चीनने केलेल्या वर्ल्ड रेकॉर्ड स्कोरच्या ०.४ पॉइंट्सने अधिक आहे. या इव्हेंटनंतर चीन आशियन रेकॉर्ड आणि गेम्स रेकॉर्ड चार्टमधून देखील बाहेर गेला आहे.
क्वालीफिकेशन राउंडमध्ये तीसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या रुद्राक्ष ६३२.५ गुणांसह टीमसाठी सर्वाधिक स्कोअर करणारा शुटर ठरला. त्यानंतर ऐश्वर्य ६३१.६ गुणांसह पाचव्या तर दिव्यांश चा फायनल स्कोअर ६२९.६ इतका राहिला. (sports news)
यासोबतच भारताना आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ च्या दुसऱ्या दिवशी रोइंग मध्ये देखील मेडल जिंकले आह. जसविंदर, भीम, पुनीत आणि आशिष यांच्या संघाने कास्य पदकावर नाव कोरलं. भारताना आतापर्यंत एकूण ७ मेडल जिंकले आहेत ज्यामध्ये एक गोल्ड देखील आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने ५ पदकं जिंकले आहेत.