हृदयाच्या आरोग्यासाठी दिवसाला किती पाणी प्यायला पाहिजे, जाणून घ्या
पौष्टिक आहार आणि भरपूर पाणी (water) पिल्यामुळे आपले शरीर नेहमी निरोगी राहते. कारण आपण काय खात आहोत आणि काय पित आहोत याच्यावर आपले शरीर निगडीत असते. त्यात तुम्हाला तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर पौष्टिक आहार घेणं खूप गरजेचे आहे. पण सध्याच्या जीवनात आपल्या आहारात आणि जीवनशैलीमध्ये अनेक बदल होत गेले आहेत. त्यामुळे बाहेरचे फास्ट फूड खाणे, कमी पाणी पिणे अशा अनेक गोष्टी आपण करत असतो. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो, हृदयावरती होतो.
डॉक्टर नेहमी प्रत्येकाला पाणी जास्त पिण्याचा सल्ला देतात. कारण पाणी (water) जर कमी पिले तर आपल्या हृदयावर त्याचा परिणाम होऊ शकतो. पाणी कमी पिल्यामुळे कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर परिणाम होतो. आपण पाणी कमी पिले तर डीहायड्रेशन होते आणि डीहायड्रेशनमुळे यकृत रक्तात मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉल सोडते, त्यामुळे हृदयविकाराचा धोका आपल्याला निर्माण होतो. त्यामुळे पाणी हे जास्त पिले पाहिजे जेणेकरून हृदयविकाराचा धोका निर्माण होणार नाही.
तसंच जर तुम्हाला हृदयाशी संबंधित काही आजार असतील तर तुम्ही हृदय निरोगी ठेवणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर तुम्हाला दररोज दिवसातून दीड ते दोन लिटर पाणी प्यावे लागेल. पाण्यासोबतच तुम्ही नारळ पाणी, ज्यूस, सरबत असे द्रव पदार्थ पिऊन तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढू शकतात.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी पाणी पिणे खूप गरजेचे आहे. कारण पाणी हे आपले रक्त परिसंचारण सुधारण्यास मदत करते आणि हृदयाच्या कार्याला चालना देखील देते. पाणी हे हृदयाच्या सर्व कक्षांना निरोगी ठेवण्यास मदत करते, त्यामुळे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हीही दररोज जास्तीत जास्त पाणी द्या आणि निरोगी रहा.