लिंबू पाणी कोणत्या वेळी प्यायला हवे? जाणून घ्या योग्य वेळ
लिंबू (lemon) पाण्यात अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे शरीराची इम्युनिटी वाढण्यास मदत होते. लिंबू पाणी प्यायल्यामुळे पचनाच्या समस्या सगळ्या दूर होतात. जसे की, अपचन, गॅस, ऍसिडीटी आणि बद्धकोष्ठता देखील. एवढंच नव्हे तर वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी फायदेशीर ठरते. लिंबू पाणी प्यायल्यामुळे बॉडी डिटॉक्स होते आणि शरीरातील संपूर्ण घाण साफ होते. अनेक लोक निरोगी राहण्यासाठी लिंबू पाणी पितात.
लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळ
लिंबू पाणी तसे तर कोणत्याही वेळी पिऊ शकता मात्र सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने अधिक फायदे होतात. लिंबू पाणी प्यायल्यामळे मेटाबॉलिज्म बूस्ट होते आणि वेट लॉस होण्यास मदत होते. या पेयाने दिवसाची सुरूवात करणे अतिशय चांगले असते. जर तुम्ही चहा कॉफीने दिवसाची सुरूवात करत असाल तर ती शरीरासाठी घातक आहे.
लिंबू पाणी पिण्याची योग्य पद्धत
लिंबू पाण्याकरता एक ग्लास कोमट पाणी प्या
यामध्ये लिंबू (lemon) आणि पुदीनाचे पाने टाका
तसेच यामध्ये शुध्द मध देखील घालू शकता
लिंबू पाण्यात काळे मीठ, दालचिनी पावडर देखील टाका
तुम्ही रिकाम्या पोटील लिंबू पाण्याचे सेवन करू शकता
लिंबू पाणी पिण्याचे फायदे
लिंबू पाणी प्यायल्यामुळे कॅलरीज बर्न होतात फॅट कमी होते
लिंबू पाण्यामुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होते. यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होईल
लिंबू पाणी अँटीऑक्सीडेंटचा चांगला सोर्स आहे. शरीर आणि त्वचा फ्री रेडिकल्सपासून सुटका होते
लिंबू पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया चांगली होते. गॅस, ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो
लिंबू पाणी प्यायल्याने लघवीशी संबंधित समस्या दूर होते
लिंबू पाण्याने त्वचा देखील चांगली होती.
जास्त लिंबू पाणी घातक
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा घातक असतो. जास्त लिंबू पाणी प्यायल्याने दातांचे नुकसान होते. रिसर्चमधून समोर आलेल्या माहितीनुसार सायट्रिक ऍसिडचे प्रमाण दातासाठी घातक असते. लिंबू आणि लिंबूवर्गीय फळांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्रास होतो. तसेच लिंबू पाणी कोमट असावे. ते अती गरम असल्यास शरीराला खास करून दाताला त्रास होऊ शकतो. एवढंच नव्हे तर लिंबूचा रस थेट पिऊ नये. तो पाण्यात मिक्स करूनच प्यावे.