खरबूजच नाही तर त्याच्या बिया देखील आहेत आरोग्याचा खजिना!

वजन कमी करण्याचे अनेक मार्ग तुम्ही शोधत असाल पण तुम्हाला माहितेय का खरबूजाच्या बिया (Melon seeds) यावर उत्तम उपाय आहेत? खरबूज बिया खाल्ल्याने वजन कमी होतं. या बिया खाऊन पोट भरते त्यामुळे लवकर भूक लागत नाही. पोट भरलेलं राहतं, भूक लागत नाही, जेवण जात नाही परिणामी वजन कमी होतं.

खरबूजाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. या बियांमुळे रोगप्रतिकारशक्ती चांगली होते. सर्दी, खोकला, ताप आणि इतर आजार यामुळे दूर पळतात.

आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपण निरोगी आहार घेतो, आपण जवळपास सगळ्याच गोष्टींची काळजी घेतो. पण आपण आतड्यांचं आरोग्य सांभाळायचं विसरतो. आतड्यांची काळजी विशेष घ्यायला हवी. खरबूजाच्या बिया (Melon seeds) बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते. याने आतड्यांसंबंधी हालचाली सुरळीत होतात. पचन सुलभ करण्यासाठी खरबूजाच्या बिया उत्तम आहेत.

व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स यासोबतच खरबूजाच्या बियांमध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिड चांगल्या प्रमाणात असतं. ओमेगा -3 फॅटी अॅसिड मुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. या बियांमुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. खरबूजाच्या बिया तुम्ही सकाळी उठून नाश्त्यात खाऊ शकता.

मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस या घटकांची गरज आपल्या हाडांना असते हे काय वेगळं सांगायची गरज नाही. हाडे मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी खरबूजाच्या बियांचा आहारात समावेश करा. यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *