IPL Auction 2022 : इलेक्ट्रिशियनचा मुलगा झाला करोडपती
(sports news) मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) आगामी आयपीएलसाठी अनेक नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. पाच वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद जिंकणाऱ्या या टीममध्ये आता 19 वर्षांचा तरूण भारतीय बॅटर खेळणार आहे. तिलक वर्मा (Tilak Varma) असं त्याचं नाव असून तो हैदराबादकडून क्रिकेट खेळतो. तिलकचा आजवरचा प्रवास खडतर ठरला आहे. त्याचे वडील इलेक्ट्रिशियन असून त्यांच्याकडे मुलाच्या कोचिंगवर लक्ष देण्यासाठी फारसे पैसे देखील नव्हते. तिलक आता आयपीएल लिलावानंतर करोडपती बनला असून त्याला मुंबईनं 1 कोटी 70 लाखांमध्ये खरेदी केले आहे.
कोचना श्रेय
तिलक वर्मानं या सर्व यशाचं श्रेय त्याचे कोच सलाम बायश यांना दिलंय. त्यांनी क्रिकेटमधील आवश्यक साहित्यासह गरज पडल्यावर तिलकला घरात राहण्यास जागा देखील दिली. वर्माचे वडील नम्बूरी नागराजू यांच्याकडे मुलाला क्रिकेट अकादमीमध्ये पाठवण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळी सलाम यांनी तिलकचा सर्व खर्च केला. तिलकला देखील कोच सलाम यांनी केलेल्या मदतीची जाणीव आहे. त्यामुळेच ‘माझ्याबद्दल काही लिहलं नाही तरी चालेल पण, माझ्या कोचचा उल्लेख नक्की करा,’ अशी विनंती केली आहे.
तिलकनं आजवर 1 फर्स्ट क्लास, 16 लिस्ट ए आणि 15 टी20 सामने खेळले आहेत. 16 लिस्ट ए मॅचमध्ये त्यानं आत्तापर्यंत तीन शतक आणि तीन अर्धशतकांसह 784 रन केले आहेत. त्याचा सर्वोच्च स्कोअर नाबाद 156 इतका आहे. त्याचबरोबर त्यानं टी20 क्रिकेटमध्ये तीन अर्धशतकं झळकावली असून त्याचा स्ट्राईक रेट 144 आहे. तिलक कामचलाऊ ऑफ स्पिन बॉलिंग देखील करतो. त्याच्या नावावर 5 विकेट्सची नोंद आहे. (sports news)
मुंबई इंडियन्सची संपूर्ण टीम : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, अनमोलप्रीत सिंग, डेवाल्ड ब्रेव्हीस, आर्यन जुयाल, इशान किशन, कायरन पोलार्ड, ऋतिक शौकीन, अर्जुन तेंडुलकर, संजय यादव, डॅनियल सॅम्स, टीम डेव्हिड, फॅबियन एलन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद अर्षद खान, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, जोफ्रा आर्चर, टायमल मिल्स, रिले मेरेडिथ, मुरुगन अश्विन, बसील थंपी