केपींमुळेच 10 हजारांहून अधिक मताधिक्क्य मिळेल : हसन मुश्रीफ

(sports news) पगार, बोनससह सर्व देणी वेळेत देणाऱ्या ‘के.पीं’च्या योगदानामुळे महालक्ष्मी आघाडीला १० हजारांहून अधिक मताधिक्क्य मिळेल, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी व्यक्त केला. महालक्ष्मी आघाडीच्या (Mahalakshmi Aghadi) वाघापूर (ता. भुदरगड) येथील प्रचार प्रारंभावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री मुश्रीफ यांच्यासह आमदार सतेज पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, संजय घाटगे, के. पी. पाटील (K. P. Patil) उपस्थित होते. मुश्रीफ म्हणाले, ‘के. पी. पाटील यांनी जास्तीत जास्त दर देऊन कर्मचाऱ्यां‍ना ३० टक्के बोनस दिला. इर्षेपोटी विद्यमान आमदारांनी इथेनॉल प्रकल्पासाठीचे इरादापत्र अडवले होते. आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून प्रश्न सोडविला.’

आमदार सतेज पाटील म्हणाले, ऊस उत्पादकाची वाढलेली आर्थिक सक्षमता टिकवण्यासाठी म्हणजेच अधिकाधिक दर मिळविण्यासाठी के.पीं.कडेच सत्ता गरजेची आहे.’ अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, ‘४,५०० क्रशिंग असणारी क्षमता ८००० टनांवर नेली. को -जनरेशन प्रकल्प यशस्वीरित्या उभारला. इथेनॉल प्रकल्पही दोन महिन्यांत कार्यान्वित होईल. विरोधक द्वेषबुद्धीतून खोटे आरोप करीत आहेत.’

या वेळी दिनकरराव जाधव यांनी केपींनी चांगला कारभार केल्याचे सांगितले. काँग्रेस तालुकाध्यक्ष शामराव देसाई यांनी स्वागत केले. याप्रसंगी संजय घाटगे, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाईंसह फत्तेसिंह भोसले, भिकाजी एकल, शरद पाडळकर, सुनील कांबळे आदींची भाषणे झाली. यावेळी प्रहार संघटनेसह विविध गटांच्या कार्यकर्त्यांनी महालक्ष्मी आघाडीला पाठिंबा जाहीर केला.(sports news)

पुणे-बंगळूर महामार्गावरुन प्रवास करत असाल, तर थांबा! सरकारला इशारा देत शेट्टींचं आज महामार्गावर ‘चक्का जाम’
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार यांनी ओळख करून दिली. याप्रसंगी युवराज पाटील, भैया माने, धैर्यशील देसाई, अंबरीश घाटगे, जी. डी. पाटील, धैर्यशील पाटील-कौलवकर, मनोज फराकटे, सुयोग वाडकर, सचिन घोरपडे, विठ्ठल मुसळे, जगदीश लिंग्रस, बाळासाहेब पाटील आदींसह उमेदवार उपस्थित होते. विवेक गवळी यांनी सूत्रसंचालन, प्रवीणसिंह पाटील यांनी आभार मानले.

हे माझेच पाप…..

के. पी. पाटील म्हणाले, ‘विद्यमान आमदारांच्या नावावर जमीन नसताना आवश्यक गरजांची पूर्तता करून घेऊन सभासद केले. हे माझेच पाप असून आता त्यांच्या नावावर किती व कुठे जमिनी आहेत यावरचे भाष्य योग्यवेळी करेन.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *