टीम इंडियाचा ‘हा’ वेगवान गोलंदाज बंगळुरू T20 मधून बाहेर?
(sports news) वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात हार पत्करलेल्या टीम इंडियाने आपल्या पराभवाचा वचपा काढला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका टीम इंडियाने 3-1 अशी खिशात टाकली आहे. दरम्यान पाचवा आणि शेवटचा सामना आज संध्याकाळी 7 वाजता बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल.
मालिका जिंकली असली तरी कोणत्याही परिस्थितीत टीम इंडियाला शेवटचा सामना हलक्यात घ्यायचा नाहीय. त्यामुळे आज जिंकण्याच्या हेतूनेच टीम इंडिया मैदानात उतरेल. यासाठी टीम इंडियाच्या खेळांडुमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले जाऊ शकते. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला खराब कामगिरीमुळे कर्णधार सूर्यकुमार यादवने चौथ्या टी-२० सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळले होते. भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या 3 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खूप फ्लॉप ठरला होता, त्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आले.
अर्शदीप सिंगने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 10 पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत. अर्शदीप सिंगला गेल्या 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये फक्त 2 बळी मिळाले आहेत. गुवाहाटी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्शदीप सिंगने गोलंदाजीच्या 4 षटकात 1 बळी घेत 44 धावा दिल्या.(sports news)
1 विकेट पण 46 धावा
अर्शदीप सिंगने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एक विकेट घेतली, पण त्यासाठी त्याने गोलंदाजीच्या 4 षटकात 46 धावा दिल्या. ऑस्ट्रेलिया विरुद्ध विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्शदीप सिंगने गोलंदाजीच्या 4 षटकात 41 धावा दिल्या.
अर्शदीप सिंगला पहिल्या टी20 सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. अर्शदीप सिंगच्या जागी दीपक चहरला प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम ठेवता येईल, असे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे आवेश खानने भारतासाठी आतापर्यंत 39 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 32 विकेट घेतल्या आहेत.