तिघेही खास! सूर्यकुमार यादव कोणला नाराज करणार?

(sports news) पाच सामन्यांच्या T20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे दिग्गज सिनिअर खेळाडू नसतानाही सुर्यकुमारच्या नेतृत्वाखाली टिमने उत्कृष्ट कामगिरी केली. आता टीम इंडिया बलाढ्य दक्षिण आफ्रिकेच्या टीमला भिडणार आहे. टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा आजपासून सुरु होत असून टिममध्ये कोण खेळणार? कोणाला डच्चू मिळणार? याबतत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

आज संध्याकाळी 8.30 वाजता इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिक टी 20 सामना सुरु होणार आहे. पुन्हा एकदा सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टिम इंडिया मैदानात उतरेल. मायदेशात खेळल्या गेलेल्या त्या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियावर 4-1 असा विजय मिळवला होता. सूर्यकुमारला त्याच्या नेतृत्वाखाली हा फॉर्म कायम ठेवायचा आहे. सर्वच खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. असे असताना मालिकेपूर्वी सुर्यकुमारसमोर कोणाला खेळवायचे आणि कोणाला बसवायचे? हे मोठे आव्हान उभे राहिले आहे. सूर्यकुमार यांच्याकडे जागेसाठी तीन पर्याय आहेत.

भारताला पहिला सामना डर्बनमध्ये खेळायचा आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया आणि कर्णधारासमोर सलामीची जोडी कोणती असेल? याचे आव्हान आहे. भारताकडे यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल हे 3 सलामीवीर आहेत.

सूर्यकुमार कोणाची निवड करणार?

आता सूर्यकुमार कोणाला वगळणार आणि कोणत्या दोघांना संधी देणार हा प्रश्न आहे. यशस्वी जैस्वालने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपली तुफानी शैली दाखवली. तर ऋतुराज गायकवाडने या मालिकेत शानदार फलंदाजी केली होती. गायकवाडने पाच सामन्यात 223 धावा केल्या होत्या ज्यात एक शतक आणि एक अर्धशतक होते. जैस्वालने पाच सामन्यांमध्ये 138 धावा केल्या होत्या ज्यात त्याने एक अर्धशतक झळकावले होते. या दोघांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत आणले होते. याआधीही या दोन्ही फलंदाजांनी भारतासाठी दमदार कामगिरी केली आहे. (sports news)

दुसरीकजे गिल सलामीवीराच्या भूमिकेत चांगली भूमिका बजावत आहे. त्याने एकदिवसीय विश्वचषकात शानदार फलंदाजी केली होती. ऑस्ट्रेलियन मालिकेत गिलला विश्रांती देण्यात आली होती त्यामुळे तो खेळला नव्हता. आता गिलला संधी मिळणार का? याची उत्सुकता आहे.

आता प्रश्न असा आहे की या तिघांमध्ये वरचढ कोण ठरेल? साधारणपणे टीमकडून सलामीसाठी लेफ्ट-राईट बॅटर्सना प्राधान्य दिले जाते. टीम इंडियाही हाच विचार करत आहे. अशा स्थितीत यशस्वी खेळणार हे निश्चित मानले जात आहे. दुसरा सलामीवीर बघितला तर गिल ऑस्ट्रेलियन मालिकेतही खेळला नसला तरी त्याचा फॉर्म परतला आहे. त्यामुळे त्याचा खेळणे निश्चित दिसत आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाड यांना बाहेर बसावे लागले तर नवल वाटणार नाही. संघ व्यवस्थापनाने डाव्या-उजव्या संयोजनाचा विचार न केल्यास आणि केवळ फॉर्म लक्षात घेऊन निर्णय घेतला तर गिल आणि गायकवाड सलामीला दिसू शकतात. टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टन सुर्यकुमार यादवचा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *