नागपुरात सोलार कंपनीत भीषण घटना
नागपुरात एक मोठा अपघात घडलाय. स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत झालेल्या स्फोट (blast) झाला आहे. नागपुरच्या बाजार गावातील सोलार एक्सप्लोझिव कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या भीषण स्फोटामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सकाळी नऊच्या सुमारास ही भीषण घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
बाजारगाव इथल्या कारखान्यातया स्फोटाची तीव्रता नेमकी किती होती याची अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाही. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले असून आतमध्ये पोहोचून स्थिती स्पष्ट होऊ शकेल, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी दिली. या स्फोटाचे नेमके कारण समोर आले नसून पोलीस चौकशी करीत आहेत. मृतांमध्ये सहा पुरुष आणि नऊ महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत स्फोट (blast) झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीतील कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंग करत असताना ही घटना घडली. “नागपूरच्या बाजारगाव गावात सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला. सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीतील कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगच्या वेळी हा स्फोट झाला” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मृतांना पाच लाखांची मदत जाहीर
या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांसाठी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. “नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात 6 महिलांसह 9 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे. नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात असून स्वतः आयजी, एसपी, जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.