RCB चा नवा कॅप्टन ठरला, ‘हा’ दिग्गज घेणार विराटची जागा
(sports news) आयपीएल 2022 (IPL 2022) मधील सर्व 10 टीम नक्की झाल्या आहेत. यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये 204 खेळाडूंची खरेदी झाली. यापूर्वी 10 टीमनी 33 खेळाडू रिटेन केले होते. आता यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण 237 खेळाडू असतील. कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) कॅप्टनपदी नियुक्ती केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) या टीमचा कॅप्टन अद्याप जाहीर होणे बाकी आहे.
पंजाबचा कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) आता लखनऊ सुपर जायंट्स टीमसोबत आहे. तर विराट कोहलीनं (Virat Kohli) आरसीबीची कॅप्टनसी सोडली आहे. ‘इनसाईड स्पोर्ट्स’ नं दिलेल्या वृत्तानुसार आरसीबीनं दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज बॅटर फाफ डुप्लेसिस (Faf Du Plessis) याचे नाव कॅप्टनपदासाठी निश्चित केले आहे. आरसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार. ‘फाफ डुप्लेसिस हाच योग्य पर्याय आहे. आम्ही मॅक्सवेल किती काळ उपलब्ध आहे, याची माहिती मिळवत आहोत. तो सुरूवातीच्या काही मॅच खेळणार नाही, अशी शक्यता आहे.’ मॅक्सवेलचं मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लग्न होणार आहे.
फाफ डुप्लेसिसवर आरसीबीने 7 कोटी रुपयांची यशस्वाी बोली लावली होती. आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये चेन्नईने कोलकात्याचा पराभव करत चौथ्यांदा ट्रॉफी पटकावली. या विजयामध्ये फाफचं योगदान मोलाचं होतं. फायनलमध्ये फाफ डुप्लेसिसने 86 रनची उत्कृष्ट खेळी केली.क्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार असलेला फाफ डुप्लेसिस आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही, त्यामुळे तो आयपीएलचा संपूर्ण मोसम खेळण्यासाठी उपलब्ध असेल. (sports news)
फाफ डुप्लेसिसनं आजवरच्या टी20 क्रिकेट कारकिर्दीमध्ये 59 इनिंगमध्ये 31 च्या सरासरीनं 7136 रन काढले आहेत. यामध्ये 3 शतक आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे. 120 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर असून त्याचा स्ट्राईक रेट 130 आहे.