जयसिंगपूर येथे राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी पदाधिकाऱ्यांची करण्यात आली निवड
प्रतिनिधी:- विजय पाटील
(local news) जयसिंगपूर येथे समाजातील कामगिरी पाहून राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविभाऊ गरुड यांच्या मार्गदर्शनाने व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनीता (ताई) पवार यांच्या उपस्थितीत झाली. पदाधिकारी यांची निवड करताना सांगली जिल्हा अध्यक्षपदी कु. प्रियंका भानुसे व कोल्हापूर जिल्हा संघटक म्हणून सौ. श्रुती ( ताई) शिंगाई यांची निवड करण्यात आली.
त्यावेळी लोक जनशक्ती पार्टीच्या कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस गीता(ताई) पाखरे व गणेश पाखरे (साहेब) व सामाजिक कार्यकर्ते भारतीय बौद्ध संघ महाराष्ट्र राज्याचे युवा अध्यक्ष श्रीकांत शिंगाई (साहेब) व सर्जेराव भानुसे (साहेब) तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. (local news)